आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vamini Sethi Completed 1100 KM Distance On Bicycle On Queen Of Mountains In 9 Days

क्वीन ऑफ माउंटन्स, सायकलवर ९ दिवसांत ११०० किमी अंतर पार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वामिनी सेठी, असिस्टंट व्हाइस प्रेसिडेंट, रॉयल बँक ऑफ स्कॉटलंड


क्वीन ऑफ माउंटन्स, सायकलवर ९ दिवसांत ११०० किमी अंतर पार
जन्म- १६ जुलै १९८५
शिक्षण- दिल्ली विद्यापीठात बीए ऑनर्स
वडील- महेंद्र सेठी, आई- मंजित
चर्चेत- त्यांनी ९ दिवसांत १,१११ किमी अंतर सायकलने पूर्ण केले.

विदेशी बँकेत कार्यरत वामिनी सेठी यांना सायकलिंगच्या जगात क्वीन अॉफ माउंटन्स म्हणून ओळखले जाते. सायकल लहानपणापासून चालवते, मात्र मागील चार वर्षांपासून त्याकडे गांभीर्याने पाहत आहे. पर्वतावरील ३५ किमी अंतराच्या स्पर्धेत दुसरा क्रमांक प्राप्त करून रॉयल बँक ऑफ स्कॉटलंडमध्ये सहायक उपाध्यक्षपदावर कार्यरत या तरुणीने आपले ध्येय या क्षेत्रात निश्चित केले. त्यांनी ‘दिव्य मराठी’ नेटवर्कला आपल्या छंदाबाबतची माहिती दिली.

२०११ ची घटना आहे. वर्तमानपत्रांत सायकलिंग मोहिमेविषयी जाहिरात प्रसिद्ध झाली. अल्पवयीन वर्गातून प्रवेशिका न भरता तिने थेट प्रौढ गटात नाव दिले. अल्पवयीन गटासाठीचे अंतर ३५ किमीचे होते. वामिनीने याआधीच त्यात यश मिळवले होते. २०१३ मध्ये जगातील सर्वात खडतर सायकल स्पर्धेदरम्यान ती सायकलवरून पडली होती आणि त्यात तिच्या मानेला मार लागला होता. ५५० किमीची ही स्पर्धा बहुतांश स्पर्धक पूर्ण करू शकत नाहीत. वामिनीने मात्र एक हात मानेवर धरून अंतर पूर्ण केले. गेल्या वर्षी ५ ऑक्टोबर रोजी पहाटे पाच वाजता सारचूहून पेंगपर्यंत सायकलवर जायचे होते. हे ठिकाण समुद्रसपाटीपासून १४ हजार फूट उंचावर आहे. तेव्हाचे तापमान उणे दोन अंश होते. अंतर ४७५ किमीचे होते व जगातील दुसरे सर्वात उंच ठिकाण तांगलांगलावर सायकल चालवायची होती. १५ पुरुषांमध्ये केवळ दोन महिला होत्या. त्यात वामिनी एक होती. दुसऱ्या दिवशी पाच किमीचा प्रवास केल्यानंतर मान दुखू लागली. अशा परिस्थितीतही दिल्लीची रहिवासी वामिनीने देशातील सर्वात कठीण हीरो एमटीबी हिमालय स्पर्धा जिंकली.

वामिनी या वेळी श्रीलंकेत १,१११ किमीचा सायकल प्रवास पूर्ण करून परतली आहे. पर्वतावर सायकल, कार चालवण्याची तिला आवड आहे. जोखीम स्वीकारणे हा तिचा पिंड आहे. त्यामुळेच कोणत्याही देशात

जाऊन प्रतिदिन १२५ किमी सायकल चालवणे तिला आवडते. ऊन, वारा, पावसात न डगमगता ती मोहीम फत्ते करते. भारतातील आशिषसोबत श्रीलंकेतील पुत्तलक ते कोलंबोपर्यंतचा प्रवास पूर्ण केला. काही दिवस जोरदार वाऱ्यामुळे प्रतिदिन सायकल ८ किमीच चालवू शकली. तिने ९ दिवसांत पूर्ण अंतर कापले.