आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घटस्फोट टाळण्यासाठी कलम ९ चा वापर प्रभावी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अलीकडेच न्यायालयात एक प्रकरण दाखल झाले होते. राजेश नावाचा मुलगा लग्नानंतर दोन वर्षांतच त्याची पत्नी रिमाकडून घटस्फोट घेणार होता. दोघांनाही रोहन नावाचा ६ महिन्यांचा मुलगा होता. राजेशने घटस्फोटासाठी अर्ज तर दिला; परंतु त्याच्या पत्नीला मुलगा मोठा होईपर्यंत बापापासून वेगळा होऊ नये, असे वाटत होते. तसेच हे लग्न टिकावे, असे रिमाला वाटत होते. तिचा उद्देश आर्थिक कारणासाठी नसला तरी मुलाला वडिलांचे प्रेम मिळावे, असेही तिला वाटत होते. मूल भावनात्मकदृष्ट्या वडिलांपासून दूर होऊ नये, त्याला वडिलांचा वेळ आणि त्याचे प्रेम मिळावे, असे तिला वाटत होते. हा मुलांचा अधिकार तर आहेच शिवाय हिंदू विवाह कायद्याचे कलम ९ अंतर्गत वैवाहिक हक्काची बहालीसुद्धा आहे.

सध्या घटस्फोटावरून वृत्तपत्रांतून खूप काही वाचण्यास मिळते आहे. लग्नाला काही वर्षे उलटून गेल्यानंतरही अनेक प्रसिद्ध व्यक्ती घटस्फोट घेतात. त्यावरून असे वाटते की, पैशासाठीच ही मंडळी विवाहबंधनात अडकली होती. विवाह हे दोन पक्षांचे एकत्र येणे हे खरे असले तरी, यात एकाधिकाराचा मुद्दाच नसतो. हिंदू विवाह कायद्यात विवाह हक्काच्या बहालीचा उल्लेख कलम ९ मध्ये करण्यात आला आहे. तो लग्न टिकवण्यासाठीच असतो.

भलेही पती किंवा पत्नी काही कारण नसताना दोघेही एकमेकांपासून वेगळे राहत असतील किंवा दोघांपैकी एक सोडून जात असेल, तर सोडून जाणाऱ्याविरोधात वैवाहिक संबंध पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी खटला दाखल करता येतो. या खटल्यातसुद्धा सोडून जाणाऱ्याकडे पोटगी मागण्याचा अधिकार खटला चालू असताना आणि नंतरही आहे. म्हणजे पती असो की पत्नी, दोघांनाही वैवाहिक हक्क बहालीचा अधिकार असतो. हा कायदेशीर हक्क असून न्यायालय यात डिक्री देऊ शकते. वैवाहिक संबंधाची बहाली म्हणजे भौतिक गरजांची पूर्तता नव्हे यात अनेक महत्त्वपूर्ण पैलू आहेत. पती आणि पत्नीच्या दरम्यान काही अधिकार आणि कर्तव्ये असतात. ते विवाहामुळेच पूर्ण होतात. हे अधिकार आणि कर्तव्य वैवाहिक अधिकाराअंतर्गत येतात. वैवाहिक हक्कांच्या बहालीस एक प्रकारे वैवाहिक प्रकरणातील उपचार असे म्हटले जाते. ते एकत्र राहणे आणि भावनात्मक पातळीवर गुंतणेही आहे, तरीसुद्धा न्यायालयात वैवाहिक हक्काच्या बहालीसाठी काही गोष्टी असणे अनिवार्य असते.

पती किंवा पत्नी दोहोपैकी एक वेगळे राहत असणे {वेगळे राहण्यामागे कोणते ठोस कारण नसणे.
सर्वोच्च न्यायालयाने सरोज राणी विरुद्ध सुदर्शनकुमार चढ्ढा प्रकरणात दाखल पत्नीच्या याचिकेवर वैवाहिक अधिकार बहाल केले होते. पत्नीला घरातून बाहेर काढण्यात आले होते. कनिष्ठ न्यायालयाने पत्नीच्या बाजूने डिक्री दिली; परंतु पतीने त्यावर अंमलबजावणी केली नाही. त्यात कलम ९ च्या संवैधानिक वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. हे तर परिच्छेद १४ किंवा २१ चे उल्लंघन आहे, असे म्हटले गेले. शेवटी कलम ९ अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाने ही डिक्री लागू केली. जस्टिस सव्यसाची मुखर्जी यांनी म्हटले : हिंदू विवाह कायद्याचे कलम ९ कोणत्याही प्रकारे परिच्छेद १४ किंवा २१ चे उल्लंघन असे म्हणता येणार नाही. एक प्रकारे हा सामाजिक प्रश्नाची सोडवणूक करत असून लग्नसंस्था मोडकळीस निघण्यापासून बचावणे आहे.

कलम ९ ची सामाजिक आणि कायदेशीर बाजू अशी आहे की, कोणत्याही कारणास्तव दोन्ही पक्षाला वेगळे होण्यापासून परावृत्त करणे. वैवाहिक अधिकारात प्रेम आणि भावनात्मक संबंध ही महत्त्वाची बाजू आहे. हे कलम त्यास परिपूर्ण करण्यास मदतच करते.

वंदना शहा
अधिवक्ता, कौटुंबिक न्यायालय, उच्च न्यायालय, मुंबई
बातम्या आणखी आहेत...