आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Varsh Jal Water Issue In Marathwada, Field Water Issue

‘वर्षा-जल’ शेतीतील जल सुरक्षेचा कायमस्वरूपी उपाय

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेती हा एक पुरातन व्यवसाय आहे. मानवाच्या अस्तित्वापासून हा व्यवसाय करण्यात येत असून प्राथमिक अवस्थेत मानवी विकासाला शेती व्यवसायाने महत्त्वाचे योगदान दिलेले आहे. शेती हा आपला प्रमुख व्यवसाय आहे. पण पावसाचा लहरीपणा व जमिनीतील घटत जाणारी पाण्याची पातळी यामुळे शेतीमधील होणार्‍या नुकसानीची तीव्रता ही आज जास्त आहे.
सर्वसाधारणपणे वर्षाकाठी सरासरी दोन पिकांसाठी प्रतिहेक्टर 30 लाख लिटर पाण्याची आवश्यकता असते. सद्य:स्थितीला उपलब्ध असणार्‍या पाण्याच्या स्रोतामध्ये केवळ पावसाचे पाणी जर ते भूगर्भात साठवले गेले तरच ते चिरकाल पाण्याचे स्रोत बनू शकतात.
भारतामध्ये सरासरी 100 से. मी. एवढा पाऊस मान्सूनच्या अवघ्या 100 दिवसांत पडतो व तोदेखील साधारणपणे 100 तासांत. त्यापैकी ८0% पाऊस हा अतिशय तीव्रतेचा असून तो केवळ 20 तासांतच पडतो, ज्यामुळे ते पाणी वाहून जाते. या सर्व समस्यांवर उपाय एकच - केएपी स्ट्रक्चर (structure) - पाऊसपाण्याचा द्रुतगती मार्ग KFP-Rwh (Patented) जगात प्रथमच भूजल पातळी वाढवून शेती वाचवण्याचे यशस्वी तंत्रज्ञान

शेतकरी बंधूंनो, विचार करा ...... शेतीसाठी पाणी हवे तरी किती?
दरवर्षी दोन पिकांसाठी अंदाजे 30 लाख लिटर पाण्याची गरज असते.
पिकांची मुळे जमिनीतील ओलाव्यातून पाणी शोषून घेत असतात. त्यांना थेट पाणी शोषता येत नाही. दरवर्षी प्रतिहेक्टर सरासरी 100 सें. मी. पाऊस पडला तर त्याद्वारे आपल्याला 100 लाख लिटर पाणी मिळते. ते मोफत असते! मात्र या पाण्यापैकी ८0 लाख लिटर पाणी बाष्पीभवनाद्वारे आणि वाहून वाया जाते.
’ केएफपी स्ट्रक्चरद्वारे हे ८0 टक्के पाणी जमिनीत रुजवले जाते आणि मातीचा ओलावा वर्षभर टिकवून ठेवते. ’ त्यामुळे विहिरीतील पाण्याची पातळी वाढते आणि मातीची धूप होत नाही. जमिनीचा पोतही सुधारतो.

केएफपी स्ट्रक्चरमुळे ...
जमीन पाण्याखाली जात नाही/ जमीन खारपड - टाकाऊ होत नाही / वार्षिक दुरुस्तीची गरज नाही, पावसाने शेतातून माती वाहून जाणार नाही/पाणीपातळी वाढेल/ विहिरीचे - बोअरवेलचे पाणी वर येईल, जमिनीत ओलावा टिकून राहील/ विजेचा खर्च कमी होईल.
अल्पवृष्टी - भूजल पातळीच वाढली नाही तर शेततळी किंवा विहिरीत पाणी कसे येणार?
अनावृष्टी - पाऊस पडलाच नाही तर जगणेच अवघड. मग शेतात काय पिकवणार?
अतिवृष्टी - अतिवृष्टी झाली, जमीन पाणथळ झाली तर वाफसा कसा येणार?
(सौजन्य- केडिया रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रा. लि., ए ६/७, सुयश कॉम्प्लेक्स,
काल्डा कॉर्नर, औरंगाबाद (0240- 3203183, 9371780701)