जगातील सर्वात उंच ठिकाणी जाण्याची सर्वाची इच्छा असते. पण ब-याच जणांना उंचावर जाण्याची भिती वाटत असते. तुम्हालाही जर फिरण्याची आणि उंचीवर जाऊन तेथील मजा घेण्याची आवड असेल तर आम्ही तुम्हाला जगातील सर्वात उंचावर असणा-या हॉटेल्सची माहिती देत आहोत. हे हॉटेल्स पाहून नक्कीच तुम्हाला भिती वाटेल पण तेथील सौंदर्य पाहून तुमचे डोळे दिपून जातील.
नुकतेच ग्रीक आयलँड येथे वोलकनिक काल्डेरा वॉलवर संतोरिनी हॉटेल बांधण्यात आले आहे. या हॉटेलमधून तुम्ही समुद्राच्या निळ्याशार पाण्याची मजा लूटू शकता.
लेअपरुस 3912, रूस
माउंट एल्ब्रुस यूरोपमधील सर्वात मोठा पर्वत आणि समुद्रसपाटीपासून 4000 मिटर उंचीवर हे हॉटेल बनवण्यात आले आहे. या हॉटेलचे नाव लेअपरुस 3912 अल्पाइन स्टेशन असे आहे. या इको हॉटेलला चार प्री-फॅब्रिकेटेड फायबर ग्लासने बनवण्यात आले आहे. हे हॉटेल सर्वात उंच ठिकाणी असून रशियात असणा-या सगळ्या हॉटेल्सपेक्षा हे बेस्ट एनर्जी इफिशियंन्सीसाठी प्रसिद्ध आहे. या हॉटेलचे इंटेरिअर आणि आर्किटेक्चरल डिझाइन आकर्षक आहे.
जगातील आणखीन अशाच हॉटेल्सची माहिती करून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा..