आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Victor Lukarsan Artical On American Mobile Market Move To Asia

अमेरिकन मोबाइल मार्केटही आशियाच्या वाटेवर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेत मोबाइल कंपन्यांमधील चढाओढ 2014 मध्ये नवे रूप घेईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. अमेरिकन मार्केट आशिया, युरोप यांच्यासारखे होऊ शकतात. या क्षेत्रांत आंतरराष्ट्रीय कॉल स्वस्त आहेत. अधिक कालावधीचा करार फारसा नसतो. कंझ्युमर आपला मोबाइल फोन स्वत: खरेदी करतो. अमेरिकेतही असेच होण्याची शक्यता दिसू लागली आहे. त्यातून अ‍ॅपल व सॅमसंगला स्वस्त फोन बनवणे भाग पडू शकते.
8 जानेवारीला लास वेगासमध्ये कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक शोमध्ये (सीईएस) अमेरिकन मोबाइल कंपन्यांच्या धोरणात बदलाचे संकेत मिळाले आहेत. अमेरिकेची चौथी मोठी वायरलेस कॅरिअर कंपनी टी मोबाइलचे सीईओ जॉन लेगेरेने घोषणा केली की, आमच्या ऑफरमुळे इंडस्ट्री हादरून जाईल.
कंपनीची ऑफर आहे की, ग्राहक त्यांची सेवा घेतील तर कनेक्शन तोडण्याची 350 डॉलर फी दुस-या मोबाइल कंपन्या-व्हेरिझॉन, स्प्रिंट किंवा एटी अँड टीला देईल आणि नव्या फोनसाठी 300 डॉलरपर्यंत कर्ज देईल. ग्राहकाला दोन वर्षांचा करार करण्याची गरजदेखील पडणार नाही. मोबाइल विश्लेषक चेतन शर्मा म्हणतात, टी मोबाइलच्या ऑफरने इतर कंपन्यांवर मोठा दबाव येईल.
खरे म्हणजे, सुमारे दहा वर्षांपासून अमेरिकन वायरलेस बिझनेस एका पायाभूत मॉडेलवर सुरू आहे. कंपन्या मोठे डिस्काउंट देऊन ग्राहकांना लालूच देत आहेत. त्यांच्याशी दोन वर्षांचा करार केला जातो. करार संपवण्यासाठी भली मोठी फी भरावी लागते. ग्राहकाने सहजपणे कंपनी बदलू नये, हा त्यामागे उद्देश. व्हेरिझॉनची टर्मिनेशन फी 350 डॉलर आहे. मोबाइल कंपन्यांमध्ये चांगले नेटवर्क पुरवणे आणि लोकप्रिय फोन देण्याची स्पर्धा लागते. मात्र, त्या मोठा नफा कमावण्याच्या मूळ सिद्धांताशी तडजोड करत नाहीत.
सध्या आयफोनसारखे मॉडेल सगळ्या कंपन्यांकडे आहेत. नवे ग्राहक कमी होत आहेत. 90 टक्क्यांपेक्षा जास्त अमेरिकन प्रौढांकडे सेलफोन आहे. त्यामुळे सध्याचे ग्राहक टिकवून ठेवण्यावर भर दिला जात आहे. टी-मोबाइलने पहिल्यांदाच खळबळ माजवलेली नाही. गेल्या वर्षी त्यांनी ग्राहकांना आपला फोन वर्षातून दोनदा अपग्रेड करण्याची सुविधा दिली. त्यासाठी महिन्याकाठी दहा डॉलर जादा घेतले. व्हेरिझॉन, एटीअँडटीनेही ही सुविधा दिली. त्यांनी दोन वर्षांचा करारही रद्द केला आहे. ग्राहकांना सुलभ मासिक हप्त्याने मोबाइल फोन पुरवण्याची सुविधा या कंपनीच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय रोमिंग शुल्क कमी करण्यात आले. अशा प्रकारची व्यावसायिक खेळी केल्यामुळे टी-मोबाइलला जवळपास वीस लाख नवीन मोबाइल ग्राहक मिळाले.
मोबाइल सेवांमध्ये बदलाची रिंगटोन
एटी अँड टीने आपल्या फोनसाठी कोणताही करार न ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
एटी अँड टीने
टी मोबाइलच्या उत्तरादाखल काही दर घटवले आहेत. एटी अँड टी आणि व्हेरिझॉन आपल्या ग्राहकांना नवीन फोन देण्याची तयारी करू शकतात.