आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेम हे औषधच, परिणाम करत नसेल तर डोस वाढवा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नुकताच मला एक मेसेज मिळाला, त्याचे अनेक अर्थ आहेत. मेसेज असा होता. एक बुद्धिमान व्यक्ती एका तरुणाला म्हणतो, प्रेम हे सर्वात चांगले औषध आहे. तरुणाने विचारले, जर या औषधाचा काही उपयोग नाही झाला तर? बुद्धिमान व्यक्तीने सांगितले की, याचा डोस वाढवा.
यानंतर मी शेजारच्या वयस्क व्यक्तीकडे गेलो होतो. कोर्टाचा एक खटला जिंकल्याबद्दल ते आनंद व्यक्त करत होते. खुनाच्या या खटल्यात त्यांना खोटेपणाने गुंतवले होते. खोट्या आरोपातून बाहेर पडायला त्यांना 20 वर्षे लागली. हा खटला तर ते जिंकले पण यातला दु:खद भाग असा की, त्यांना परिवाराचं प्रेम कधीच मिळालं नाही. निकालाच्या दिवशी त्यांची फक्त पत्नीच न्यायालयात आली होती. कुटुंबातील पाच मुले आणि अन्य सदस्यांनी त्यांच्या व त्यांच्या पत्नीची साथ दिली नाही. मी विचार करू लागलो, ही अशी स्थिती कशाने आली? मला एक गोष्ट आठवली.
एक संत महात्मे आपल्या शिष्यांसमवेत नदीकिनारी बसले होते. थोड्या वेळानंतर तेथे एक कुटुंब आले आणि त्यांच्याजवळ बसले. त्यानंतर कुटुंबातील एक सदस्य एक दुस-यावर ओरडू लागले. एक दुस-यापेक्षा वरचढ होण्याचा प्रयत्न करू लागले. सगळ्यांचा राग वाढत गेला. स्थिती गंभीर होत गेली. ते संत आपल्या आसनावरून उठले, चेह-यावर शांत भाव आणले, दोन्ही हात जोडून त्या कुटुंबाजवळ गेले आणि त्यांनी शांत राहण्याचे आवाहन केले. यानंतर ताबडतोब ही भांडणारी कुटुंबे शांत झाली. यानंतर ते संत पूर्ववत आपल्या स्थानी येऊन बसले. शिष्यांनी हे पाहिले की, परिवारातील सदस्य एकमेकांना आलिंगन देत आहेत आणि एकमेकांची माफी मागत आहेत.
दुस-या दिवशी शिष्यांनी संताला प्रश्न विचारला की, परिवारातील सदस्य जणू एकमेकांचे शत्रू असल्याप्रमाणे भांडत असताना हा चमत्कार कसा झाला? तेव्हा त्या महात्म्याने उत्तर दिले की, त्यांच्या मनात एकमेकांबद्दल गैरसमजुती होत्या. यामुळे एकमेकाविरुद्ध कठोर भाषेचा वापर करत होते. रागाच्या विरुद्ध प्रेमामध्ये लोक नरम आणि गोड भाषेचा वापर करतात. यामुळे ते सर्व एकमेकांच्या आणखी जवळ येतात. कुटुंबातील सदस्यांप्रती पे्रम आणि दयेचा भाव घेऊन मी त्यांच्याकडे गेलो. त्यांनी माझ्या प्रेम आणि दयेचे त्याच भाषेत उत्तर दिले. दयेमध्ये समजुतदारपणाची ताकद आहे. यामुळे प्रथम सुरक्षेची भावना आणि नंतर सद्भाव येतो. मी त्यांच्या मनात पुन्हा प्रेमाचा भाव जागृत केला. या संतांनी जे सांगितलं, त्याचा सर्वांनी अंगीकार करणे गरजेचे आहे. प्रेम आणि दयेचे बीज पेरा, गोड आणि नरम भाषेत बोला.