आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चित्रीकरणासाठी वसलेले गाव पर्यटकांमध्ये लोकप्रिय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
युरोप आणि आफ्रिकन खंडादरम्यान माल्टा हा बेटावर वसलेला देश आहे. या देशातील पोपाए या गावाची दक्षिण युरोपमधील सर्वोत्कृष्ट पर्यटन स्थळांमध्ये निवड करण्यात आली आहे. शहरी वातावरणापासून दूर, निसर्गाच्या सान्निध्यात राहण्यासाठी लोक इथे येतात. यात अमेरिकन आणि युरोपीयन पर्यटकांची जास्त संख्या असते. संपूर्ण माल्टाची लोकसंख्या ४.५ लाख आहे. पोपाए गाव हे मोठ्या शिळांच्या पायथ्याशी समुद्र किनाऱ्यावर वसलेले आहे. समुद्राचे स्वच्छ पाणी आणि अप्रतिम वातावरण हे या गावाचे वैशिष्ट्य आहे.

१९८० मध्ये एका चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी हे गाव वसवण्यात आले होते. चित्रपटातून प्रसिद्धी मिळाल्यावर आजूबाजूच्या गावांतील लोक येथे येऊन राहू लागले. त्यानंतर त्याला ‘स्वीट हेवन व्हिलेज’ म्हटले जाऊ लागले. इथे लग्नसमारंभापासून सुट्यांमधील वॉटर स्पोर्ट्सचेही आयोजन केले जाते.
imgur.com
बातम्या आणखी आहेत...