आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षण 7 वी, नोकरी 4 हजारांची, आज 50 कोटींच्या कंपनीचे मालक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ध्येय, चिकाटी असेल तर अपुरे राहिलेले शिक्षणही करिअरमध्ये बाधा आणू शकत नाही. विमल सांगतात, ‘आर्थिक परिस्थिती ठीक नव्हती. सातवीनंतर शाळा सुटली. वडील हिर्‍याला पैलू पाडण्याचे काम करत असत. मीही ते काम शिकून घेतले. 20 वर्षांचा होतो तेव्हा शेजार्‍यांशी भांडण झाले. वडिलांनी मला घरातून बाहेर काढले. दुसरीकडे जाऊन काम शोध, म्हणाले. मार्च 1996 मध्ये मी मुंबईला गेलो. ’

मुंबईत 4000 रुपये महिना पगारावर एका कारखान्यात हिर्‍याला पैलू पाडण्याचे काम मिळाले. दोन वर्षे तेच केले. पगार 75 टक्क्यांनी वाढला होता, मात्र यापुढे जाऊ शकणार नाही, हे माहीत होते. 1997 मध्ये कमिशनवर कच्चे हिरे आणि रत्नांची ब्रोकिंग करणार्‍या मित्रांशी ओळख झाली. हे लोक श्रीलंका आणि थायलंडमधील व्यावसायिक आणि स्थानिक व्यावसायिक-ज्वेलर्सदरम्यान ब्रोकिंग करत असत. त्यांना दिवसाला 1 हजार ते 2 हजार रुपये कमिशन मिळू लागले. विमल सांगतात, ‘1999 पर्यंत 50 हजार रुपये जमा झाले होते.
त्यातून स्वत:ची कंपनी सुरू केली. विदेशी व्यावसायिकांकडून थेट रत्ने खरेदी करायला सुरुवात केली आणि ते स्थानिक व्यावसायिकांना विकू लागलो.’ मात्र एप्रिल 2001 मध्ये त्यांचा एक कर्मचारी एका व्यावसायिकाचे 29 लाख रुपये घेऊन पळाला. हे पैसे फेडण्यासाठी विमल यांना सर्व विकावे लागले. पुन्हा ब्रोकिंग सुरू केली.

पाच वर्षांत पुन्हा व्यवसाय सुरू झाला. मुंबईतील झव्हेरी बाजारात छोटी जागा लीजवर घेतली. श्रीलंका आणि थायलंडहून थेट हिरे-रत्ने येत असत. विमल सांगतात, ‘2008 मध्ये मंदी आल्यानंतर पेमेंट मिळेपर्यंत खूप उशीर होत होता. पैसा नसल्यामुळे आयात कठीण जाऊ लागली. त्यामुळे रिटेलमध्ये येण्याचा निर्णय घेतला. मे 2009 मध्ये जळगावात दागिन्यांचे शोरूम सुरू केले. आज महाराष्ट्रात 52 शोरूम्स आहेत. वाशी येथे जेम्स अँड ज्वेलरीचा कारखानाही सुरू आहे.’

जन्म : 1976, आणंदमध्ये
शिक्षण : सातवीपर्यंत शिकले
वडील : हिर्‍याला पैलू पाडण्याचे काम करत
चर्चेचे कारण : प्रायव्हेट इक्विटीद्वारे त्यांची कंपनी 40 कोटी रुपये कमावेल. देशभरात कामाचा विस्तार करणार.