आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाजाराचे संसदेच्या हिवाळी अधिवेशनावर लक्ष

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देशातील अर्थव्यवस्थेत ट्रिगरची कमतरता आणि जागतिक बाजारात असलेल्या सतर्कतेमुळे गेल्या आठवड्यात देशातील शेअर बाजारात कमजोरी कायम राहिली. युरोपमधील काही देशांमध्ये दहशतवादी हल्ल्यांची शक्यता पाहता जगभरातील गुंतवणूकदारांच्या धारणेवर परिणाम झाला. वास्तविक अमेरिकी शेअर बाजारात गेला आठवडा खूपच चांगला राहिल्यानंतर काही सतर्क राहण्याची अपेक्षा होती आणि जगभरातील बाजारात कोणतीच सकारात्मक घडामोड नाही. या व्यतिरिक्त चीनची अर्थव्यवस्थेमुळे चिंता आहेच आणि फेडरल रिझर्व्हच्या पुढील बैठकीत अमेरिकेत व्याजदरात वाढ होण्याच्या शक्यतेमुळे बाजारातील धारणेवर परिणाम करणे सुरू केले आहे. त्याच बरोबर कमोडिटीच्या किमती कमी होत असल्यामुळेदेखील बाजाराच्या चिंतेचे कारण आहे, जे मागणी घटण्याचे संकेत देत आहेत. वरवर सांगायचे झाल्यास भारत, अमेरिकामध्ये असलेल्या सुट्यांमुळे आधीच लहान झालेल्या या अाठवड्यातील बाजारात अंडरटोन सतर्कता कायम राहण्याची शक्यता आहे. पुढे पाहिले तरी भारतीय शेअर बाजारात गुुरुवारी घसरणीच्या शक्यतेसोबतच अस्थिरता दिसून येण्याची शक्यता आहे. शेअर बाजारात गुुरुवारपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची उत्सुकतेने वाट पाहत आहे. संसदेचे हे अधिवेशन शेअर बाजाराच्या दृष्टीने खूपच महत्त्वपूर्ण आहे. कारण संसदेत अनेक महत्त्वपूर्ण विधेयक खूप दिवसांपासून अटकलेले आहेत. देशातील अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी हे विधेयक मंजूर होणे खूपच आवश्यक आहेत.

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात जोरदार हंगामा होण्याची शक्यता असल्याचे मानले जात असल्यामुळे, आगामी काळासाठी गुंतवणूकदारांमध्ये सतर्कता कायम आहे. गुरुनानक जयंती असल्यामुळे बुधवारी देशातील शेअर बाजार बंद राहिले. गुरुवारी नोव्हेंबर महिन्यातील वायदा सौद्याची अंतिम तारीख आहे, यामध्ये बाजारात काही प्रमाणात चढ-उतार दिसण्याची शक्यता आहे. याचप्रमाणे अनेक अनिश्चितेच्या मुद्यांमुळे येणाऱ्या काळात बाजारावर दबाव कायम राहण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत राजकोशीय घाट्याची आकडेवारीदेखील या महिन्याच्या शेवटी जाहीर होणार आहेत. देशातील अर्थव्यवस्थेची स्थिती समजून घेण्यासाठी बाजाराचे या आकडेवारीवर लक्ष असणार आहे. राजकोशीय घाट्याची आकडेवारी वाढली तर, बाजारासाठी ही नकारात्मक बातमी असणार आहे. जी बाजारावर मोठ्या प्रमाणात नकारात्मक परिणाम करेल.
तांत्रिकदृष्ट्या बाजारात कमजोरी दिसून येत आहे. येणाऱ्या काळात यात आणखी घसरणीची शक्यता आहे. अशा स्थितीत निफ्टीला पहिला आधार ७८११ अंकाच्या जवळपास मिळेल. हा एक मध्यम आधार असेल. ही पातळी तुटली तर निफ्टीला पुढचा आधार ७७७२ अंकाच्या जवळपास मिळेल. हा घसरणाऱ्या बाजारासाठी एक मजबूत आधार असल्याचे दिसते. निफ्टी या पातळीवर कायम राहिला तर नवीन वाढीसाठी पुढे जाण्याआधी बाजारात काही दिवसांपर्यंत या मर्यादेत राहण्याची शक्यता आहे. मात्र, निफ्टीने ही पातळी ओलांडली तर त्याला पुढील मोठा आधार ७७१२ अंकाच्या जवळपास मिळेल. बाजारासाठी नजीकच्या काळातील ती नीचांकी पातळी असेल. बाजारातील पुढील दिशा ठरवण्यासाठीची ही परीक्षादेखील असून शकते. या पातळीच्या खाली निफ्टी आल्यास बाजारात नकारात्मक धारणा वाढीस लागून घसरणीकडे जात असल्याची ही पुष्टी असेल.

वाढीचा विचार केल्यास निफ्टीला मुख्य रेजिस्टन्स ७८७७ अंकाच्या जवळपास मिळेल. वास्तविक हा एक मध्यम रेजिस्टन्स असेल. मात्र, अर्थपूर्ण ट्रिगर मिळाल्यास निफ्टी या पातळीला पार करून पुढे जाण्याची शक्यता आहे. या पातळीच्या वर निफ्टी बंद झाल तर बाजारात छोटीशी वाढ होण्याची शक्यता आहे. म्हणजेच निफ्टी ७९२५ अंकापर्यंत पोहोचू शकतो. हा निफ्टीसाठी एक मजबूत रेजिस्टन्स असेल. या पताळीवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. कारण निफ्टी या पताळीच्या वर बंद झाल्यास बाजार पुढील काळात वाढण्याचे लक्षण असेल. निफ्टीला अर्थपूर्ण रेजिस्टन्स ८१०७ अंकाच्या जवळपास मिळेल.

शेअरमध्ये या आठवड्यात आयसीआयसीआय बँक आणि सेंच्युरी टेक्स्टाइल्स चांगल्या स्थितीत दिसत आहेत. आयसीआयसीआय बँकेचा सध्याचा बंद भाव २६३.३५ रुपये आहे. तो पुढे २६८ रुपयांपर्यंत वाढू शकतो. त्याला खाली २५६ रुपयांवर स्टॉप लॉस आहे. सेंच्युरी टेक्स्टाइल्सचा बंद भाव ५७७.२० रुपये आहे. तो ५८७ रुपयांपर्यंत वाढू शकतो. घसरणीत त्याला ५६८ रुपयांवर स्टॉप लॉस आहे.
(लेखक तांत्रिक विश्लेषक व moneyvistas.com चे सीईओ आहेत.)
vipul.verma@dbcorp.in