Home | Divya Marathi Special | virappa moily statement

विमानतळावर का नाही पाठवले?

दिव्य मराठी नेटवर्क (दिल्ली) | Update - Jun 04, 2011, 01:03 PM IST

वरीप्पा मोईली कधी दिल्ली विमानतळावर गेले नाहीत असे नाही; मात्र मागच्या काही दिवसांमध्ये ते या गोष्टीवरून चिंतित दिसत होते की सरकारच्या ट्रबल शूटर मंत्र्यांमध्ये त्यांचे नाव घेतले जात नाही.

  • virappa moily statement

    वरीप्पा मोईली कधी दिल्ली विमानतळावर गेले नाहीत असे नाही; मात्र मागच्या काही दिवसांमध्ये ते या गोष्टीवरून चिंतित दिसत होते की सरकारच्या ट्रबल शूटर मंत्र्यांमध्ये त्यांचे नाव घेतले जात नाही. प्रणवबाबू, कपिल सिब्बल, सुबोधकांत सहाय आणि पवन बन्सल यांना तर बाबा रामदेव यांना समजावण्याचे काम दिले आहे. मात्र, सर्व घटनेची माहिती मोईली यांना नव्हती.

    मंत्रिमंडळात होणा:या फेरबदलात मोईली यांचे कायदामंत्रिपद जाणार, अशी चर्चा होत होती. त्यामुळे आधीच त्यांचे चित्त था:यावर नव्हते. काही लोकांनी तर आपल्या मनानेच अशी अफवा पसरवली होती की, मोईली यांच्याकडून मंत्रिपदच जाणार आहे. अशा अफवा उठत असताना त्यांना पीएमओकडून चांगल्या बातमीची गरज होती. त्यामुळे या अफवा अफवाच ठरल्या असत्या. मोईली यांचे दुखणे हेच आहे की, त्यांना ट्रबल शूटर मानले नाही. ज्या गोष्टीवर त्यांचा विश्वास होता ती गोष्टही अपेक्षेप्रमाणे यशस्वी होऊ शकली नाही.

Trending