आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vrishali Arjunwadkar Article About Intelligence Quotient And Emotional Quotient

BLOG: भावनिक बुद्धिमत्ता- यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दोन भाऊ विकास आणि प्रकाश. दोघेही अतिशय बुद्धिमान. विकास मोठा आणि प्रकाश छोटा. दोघेही घरच्याच व्यवसायात. वडिलांनी उभी केलेली फॅक्टरी पुढे वाढवण्यासाठी दोघेही झटून काम करायचे. पण हळूहळू जसजसे दिवस पुढे गेले, एका युनिटचे चार युनिट झाले तसतसे त्यांचा व्यवसाय प्रकाशच्या नावाने ओळखला जाऊ लागला. सर्वांच्या तोंडात प्रकाशचेच नाव झाले. विकासला प्रश्न पडला की मी मोठा असून, मी ही या व्यवसायासाठी इतकी मेहनत घेऊन मला कुणीच ओळखत नाहीये. सर्वांच्या तोंडी केवळ प्रकाशचेच नाव आहे. येणारे नवीन क्लाएंटस् प्रकाशलाच भेटण्यासाठी उत्सुक असतात. फॅक्टरीतील कामगारसुद्धा त्यांच्या अडचणी, समस्या घेऊन प्रकाशकडेच जातात. त्याला याचा थोडा राग देखील आला पण त्याने असे का घडते याचा शोध घेण्याचे ठरवले. त्याने एका मानसोपचार समुपदेशकाची मदत घेतली. त्या मानसोपचारतज्ज्ञाने एक आठवडा फॅक्टरीत येऊन दोघा भावांचे निरीक्षण केले. आठवडा झाल्यावर त्यांनी विकासला त्याच्या प्रश्नाचे उत्तर दिले.

दोघे भाऊ जरी बुद्ध्यांक (IQ) आणि मेहनत या बाबतीत एकसमान असले तरी मुख्य फरक होता तो भावनिक बुद्धिमत्तेचा (EQ). प्रकाशचा बोलका खेळकर स्वभाव, प्रत्येकाची आत्मीयतेने विचारपूस करणे, कुणाला काही अडचण असेल तर त्याची समस्या समजावून घेऊन त्याला शक्य ती मदत करणे, कुठलीही परिस्थिती शांतपणे कौशल्याने हाताळणे, कामाच्या ठिकाणी वातावरण हलकेफुलके आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करणे इ. बरेच गुण प्रकाशकडे होते ज्यामुळे तो प्रत्येकाला हवाहवासा वाटत होता. जरी दोन गटांमध्ये किंवा दोन कामगारांमध्ये काही भांडण, मतभेद असतील तरी प्रत्येकाला ज्याची त्याची चूक समजावून देतानासुद्धा त्याच्या चतुरपणा आणि हजरजबाबीपणामुळे दोन्ही बाजू फारशा दुखावल्या न जाता प्रश्न सुटत असे. दोघांमध्ये जरी एकसमान बुद्धीमत्ता असली तरी स्वतःच्या भावना नियंत्रित करण्याचे, इतरांच्या भावना जाणून घेण्याचे आणि त्याप्रमाणे परिस्थिती हाताळण्याचे जे कौशल्य प्रकाशकडे होते त्यामुळे प्रकाशचे नाव सर्वतोमुखी झाले होते.

IQ (Intelligence Quotient) हा शब्द आपल्या ओळखीचा आहे. ज्याचा IQ जास्त तो हुशार असे आतापर्यंत आपल्याला माहित होते. IQ चांगला असेल तर ती व्यक्ती सर्वगुणसंपन्न, मग त्याच्याकडे एखादी गोष्ट कमी असेल तरीही त्याकडे दुर्लक्ष केले जात होते. पण भावनेच्या क्षेत्रात जसजसे संशोधन होत गेले तेव्हापासून भावनिक बुद्धिमत्तेला ( Emotional Quotient) महत्व प्राप्त होऊ लागले. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी केवळ शैक्षणिक बुद्धिमत्ता महत्वाची नसून त्याहीपेक्षा कित्येक पटीने जास्त भावनिक बुद्धिमत्ता महत्वाची आहे असे संशोधन पुढे आले.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा...भावनिक बुद्धिमत्तेचे दोन भाग...