आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vrishali Arjunwadkar Article Of Parents And Child Relation

BLOG: पालक आणि मुले नातेसंबंध

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रुषी हत्याकांड, लात्कारांच्या घटनांमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग, परीक्षेत अपयश आल्यामुळे मुलांच्या त्महत्या, एखादी गोष्ट मनाविरुद्ध ऐकावी लागल्यामुळे मुलांच्या आत्महत्या किंवा पालकांवरील/आजी- आजोबांवरील जीवघेणे हल्ले, रेव पार्ट्यांमध्ये अतिश्रीमंत घरातील अल्पवयीन मुलांचा सहभाग अशा बातम्यांनी वर्तमानपत्र रोज भरलेले असते. आपण अशा बातम्या वाचतो, ऐकतो तेवढ्यापुरते हळहळतो आणि पुढे जातो.
मुले अशी वागत आहेत ही त्यांची चूक की त्यांच्यावर नियंत्रण न ठेवणार्‍या/ठेवू न शकणार्‍या त्यांच्या पालकांची की बर्‍यावाईट प्रवृत्तीने भरलेल्या समाजाची? रोजच्या सर्वसाधारण जगण्यातील ताण वाढत आहेत. ते खरेही आहे. कामाचे ताण, नोकरी व्यवसायात पुढे जाण्यासाठी जीवघेणी स्पर्धा आणि त्यामागे धावणारे पालक. घराघरात नात्यांमधील ताण वाढला आहे आणि संवाद कमी झाला आहे त्यामुळे पालक आणि मुले यांच्यातील अंतर वाढत चालले आहे. संवादाचा पूल नसेल तर दोन किनारे जोडले जाणार तरी कसे? समुपदेशनासाठी येणाऱ्या केसेस मध्ये ही पालक-मुले संवादाचा अभाव हे समस्येला खतपाणी घालणारे प्रमुख कारण म्हणून पुढे येते. यासाठी पालकांकरिता काही कानमंत्र आणि काही कानमंत्र मुलांसाठी.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, पालकांसाठी कानमंत्र...