आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vrishali Arjunwadkar Blog Article About Rape And Human Mentality

BLOG: बलात्कारी प्रवृत्ती निपटून काढायला हवी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेल्या काही दिवसांतील लहान मुलांवरील लैंगिक अत्याचाराच्या बातम्यांनी आणि त्यावरील प्रतिक्रियांनी वर्तमानपत्रांचे रकाने भरत आहेत. प्रत्येकाचे मन सुन्न झाले आहे. पालक म्हणून तर प्रत्येक जण धास्तावलेलाच आहे. कुणावर विश्वास ठेवावा आणि कुणावर नको काहीच कळेनासे झाले आहे. त्यात कुणी नेता म्हणतो बलात्कार ही चूक आहे, मुलांकडून अशा चुका होत असतात त्यासाठी त्यांना फाशी नको द्यायला. बलात्काराच्या कायद्यात बदल करायला हवा. असे राजकारणी जर राज्यकर्ते झाले तर काय होणार आपल्या मुलामुलींचं? आणि या राजकारण्यांचा हा पब्लिसिटी स्टंट समजला तरी ही अशी विचारसरणी असणारा किंवा या राजकारण्यांचे अनुकरण करणारा मोठा वर्ग समाजात आहे त्यांना तर हे खुलेआम समर्थनाचे प्रमाणपत्र दिल्यासारखे आहे.
मध्यंतरी एका परदेशी मुलीने भारतात आल्यावर तिला किती लैंगिक अत्याचाराला सामोरे जावे लागले त्याबद्दल लिहिलेला ब्लॉग प्रसिद्ध झाला होता. तिने लिहिले होते की भारत देश हा पर्यटनासाठी अतिशय चांगले ठिकाण आहे पण स्त्रियांसाठी हा देश अजिबात सुरक्षित नाही आणि त्याला सर्वाधिक समर्थन भारतीय स्त्रियांकडून मिळाले होते. संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार आयोगाच्या म्हणण्यानुसार बलात्कार ही भारताची राष्ट्रीय समस्या आहे. अगदी लहान मुलीपासून ते वृद्ध महिलेपर्यंत कुणीही इथे सुरक्षित नाहीये. स्त्रियांवरील अश्या लैंगिक अत्याचारांचा इतिहास मध्ययुगीन भारतातील मुघल आक्रमणापासून सापडतो. स्वातंत्र्यानंतर फाळणीच्या काळात स्त्रियांवरील अत्याचाराचा कळस गाठला गेला ते अगदी आताच्या 2012 मधील निर्भया केसने तर अत्याचाराची परिसीमा पार केली. निर्भायाच्या घटनेमुळे देश इतका ढवळून निघाला तेव्हा असे वाटले की यामुळे अश्या प्रकरणांना थोडा तरी आळा बसेल, असे गुन्हे करणाऱ्यांना थोडी का होईना दहशत वाटेल पण लैंगिक अत्याचाराचे प्रमाण जशास तसेच आहे किंवा वाढतच आहे असे म्हणावे लागेल.
पुढील स्लाइड्‍सवर वाचा, 'मुली, स्त्रियांनी आपल्या वागण्यावर थोडे निर्बंध घालवे...'