आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vrishali Arjunwadkar Blog Article About Single Life

BLOG: एकटेपणा हा जीवघेणा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एका नातेवाईकांच्या घरी गेले होते. तीन पिढ्या एकत्र होत्या त्या घरात. नवरा बायको, त्यांची मुले, सासू आणि आजेसासू. त्या आजींशी थोडा वेळ बोलले तर त्यांना इतका आनंद झाला की माझा हात हातात घेऊन त्या म्हणाल्या, माझ्याशी तू येऊन बोललीस मला खूप बरं वाटलं. घरात इतकी माणसं आहेत, पण माझ्याशी कुणी बोलतच नाही. कंटाळा येतो या एकटेपणाचा. मरण येत नाही म्हणून जगत रहायचं.

तिसरीत शिकणार्‍या यशच्या घरी तो आणि त्याचे आई बाबा एवढीच माणसं आहेत. आई आणि बाबा दोघेही नोकरीला जातात त्यामुळे शाळेतून यश घरी येतो तेव्हा तो स्वतःच टेबलवर झाकून ठेवलेले अन्न वाढून घेतो, जेवतो आणि संध्याकाळी आई बाबा येईपर्यंत एकटाच घरी असतो. एकटाच असल्यामुळे त्याला घरातून बाहेर जाण्याची परवानगी नाही. अभ्यास आणि टीव्ही यात त्याचा दिवस जातो. संध्याकाळी आई बाबा आल्यावर त्यांना इतर कामे असतात आणि यश मित्रांसोबत खेळायला जातो. त्यामुळे आई बाबांवर अवलंबून न राहता तो स्वयंभूपणे मोठा होत आहे.

प्रीशाची सकाळी तीन तासांची शाळा. आईची कामे उरकेपर्यंत प्रीशा घरी येण्याची वेळ होते. ती घरी आली की आईला विश्रांतीच मिळत नाही म्हणून आईने तिला पाळणाघरात घातले आहे. प्रीशा शाळेतून थेट पाळणाघरात जाते. तिथेच जेवते, झोपते, थोडावेळ खेळून झाल्यावर मग दुपारी घरी येते. आईपासून दूर नेणारी शाळा आणि पाळणाघर तिला मुळीच आवडत नाही. त्यामुळे घरी असताना ती एक मिनिटही आईला मोकळे सोडत नाही. उलट आईला काम उरकल्यावर थोडा वेळ विश्रांती मिळते, बाहेरची कामे करता येतात म्हणून आईला पाळणाघराची मदत होते. 'दिवसातील थोडावेळ स्वतःसाठी मिळतो म्हणून मी बरी आहे नाहीतर मला वेडच लागेल' असे तिची आई म्हणते.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, एकटेपणा हा गंभीर रोगासारखा पसरत चालला...