आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासध्या टीव्हीवर एका कंपनीची जाहिरात येते. तुम्हाला नवीन सामान, नवीन कपडे खरेदी करायचे आहेत तर आधी जुने सामान आणि कपडे काढून टाका म्हणजे ते त्यांच्या वेबसाईटवर विका. फेसबुकवरही बरेच जण लिहितात ज्यांना माझ्याशी काही देणेघेणे नाही अशांनी कृपया स्वतःहून मला त्यांच्या फ्रेन्डलिस्टमधून काढून टाकावे अन्यथा मला ते काम करावे लागेल. उगीच जागा अडवून राहू नये.
वर उल्लेख केलेली दोन्ही उदाहरणे परस्पराहून भिन्न आहेत पण दोन्हीही एकच गोष्ट सांगतात ती म्हणजे अडगळ जमा करू नका. आधीचे सामान घरात असेल तर नवीन काही विकत घेतल्यावर ठेवणार कुठे? त्यासाठी आधीच जागेची तजवीज करून ठेवायला हवी. जर जुन्याच सामानाने सगळी जागा व्यापली असेल तर नवे सामान त्यातच दाटीवाटीने बसवावे लागेल पण नव्या बरोबरच जुने सामानही डोकावत राहील.
पुढील स्लाइडवर वाचा, मनावर नकारात्मक विचारांची जमलेली जळमटं काढून टाका...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.