आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vrishali Arjunwadkar\'s Article On Moral Thoughts

BLOG: छोट्या गोष्टीतूनही मिळते सकारात्मक उर्जा!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
का छोट्या मुलाला देवाला भेटायचं होतं. त्याने एका बॅगेत त्याचे कपडे भरले आणि काही केक घेतले. तो चालत निघाला. बराच वेळ चालल्यावर तो एका बागेपाशी आला. आता त्याचे पाय दुखत होते आणि त्याला भूकही लागली होती म्हणून तो बागेत एका बाकावर जाऊन बसला. त्याने केकच्या पाकिटातून काही केक खाण्यासाठी काढले.
इतक्यात त्याचे लक्ष त्याच्या जवळच बसलेल्या एका वृद्ध स्त्रीकडे गेले. ती बिचारी भुकेने व्याकूळ झालेली होती. त्याने आपल्या जवळचा एक केक तिला दिला. आनंदाने तिचे डोळे चमकले आणि कृतज्ञतेने तो केक घेतला आणि ती त्याच्याकडे पाहून हसली. तिचे ते हास्य इतके प्रसन्न होते की मुलाला ते पुन्हा पाहावेसे वाटले. त्याने थोड्या वेळाने अजून एक केक तिला देऊ केला. त्यावर ती वृद्ध स्त्री पुन्हा त्याच्याकडे पाहून तशीच हसली. मुलाला खूप छान वाटले. एक शब्द ही न बोलता केवळ केक देणे आणि हसणे एवढीच देवघेव दोघांमध्ये चालू होती.
संध्याकाळ झाली. मुलाला अंधाराची भिती वाटू लागली. तो उठला आणि घराच्या दिशेने चालू लागला. काही पावले पुढे गेल्यावर तो परत मागे वळला. त्याने पळत जाऊन त्या वृद्धेला मिठी मारली. तिनेही त्याचे चुंबन घेतले आणि पुन्हा एकदा ते निखळ हास्य तिच्या चेहर्‍यावर उमटले.
तो जेव्हा घरी परतला तेव्हा त्याच्या चेहर्‍यावरून ओसंडणारा आनंद पाहून आई आश्चर्यचकित झाली. तिने विचारले, ''आज बाहेर असे काय झाले आहे की तुझ्या चेहर्‍यावर आनंद इतका ओसंडून वाहत आहे?''
त्यावर तो छोटा मुलगा म्हणाला, ''आई, आज मी देवाबरोबर जेवलो.''
यावर आई काही म्हणणार इतक्यात तो म्हणाला, ''तुला माहीत आहे का? आजपर्यंत माझ्या आयुष्यात इतकं सुंदर हास्य मी कधीच पाहिलं नाहीये.''
वृद्ध स्त्री जेव्हा तिच्या घरी पोहोचली तेव्हा तिचा ही चेहरा उजळलेला होता. तिच्या चेहर्‍यावरील समाधानाचे भाव पाहून तिच्या मुलाने तिला विचारले, ''आज तू असं काय केलं आहेस की ज्यामुळे तुला इतका आनंद झाला आहे?''
तिने उत्तर दिलं, ''आज मी बागेत देवाबरोबर केक खाऊन आले आहे''
मुलाने पुढे काही विचारण्याआधीच ती पुढे म्हणाली, ''माझ्या अपेक्षेपेक्षा तो खुपच लहान आहे.''
बर्‍याच वेळेस आपण एक प्रेमळ स्पर्श, एक स्मितहास्य, एखादा गोड शब्द, बोलणार्‍यासाठी ऐकणारा कान, प्रामाणिक प्रशंसा, आपुलकीची एखादी कृती या छोट्या गोष्टीना अजिबात किंमत देत नाही पण या छोट्या गोष्टींमध्ये माणसाचे आयुष्य बदलण्याची ताकद असते.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, देव कसा दिसतो....