आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vrishali Arjunwadkar\'s Blog On Be Positive Attitude

BLOG: दु:खी करणार्‍या गोष्टी का लक्षात ठेवायच्या?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सानिकाचा काल वाढदिवस होता. सकाळी कॉलेजला जाताना तिने खास वाढदिवसासाठी आणलेला निळ्या रंगाचा सलवार कुर्ता घातला होता. कॉलेज संपल्यावर सर्व मित्रमैत्रिणींना पार्टी देण्याचा तिचा बेत आधीच ठरला होता. खूप आनंदात ती कॉलेजला गेली. सगळे मित्रमैत्रिणी तिची वाट पाहत होते. सर्वानी तिला शुभेच्छा दिल्या. तिच्याकडून पार्टी कुठे हवी यावर सर्वांची चेष्टामस्करीही चालली होती. इतक्यात सानिकाच्या वर्गातील राधिका तिथे आली. सानिका आणि राधिका या दोघींचेही एकमेकीशी फारसे जमत नव्हते. राधिका दिसायला सुंदर होती, अभ्यासात हुशार होती आणि कॉलेजच्या इतरही स्पर्धा आणि उपक्रमात ती पुढे असायची त्यामुळे तिचे सर्वत्र कौतुक व्हायचे. पण सानिकाही सर्वच बाबतीत तिच्या तोडीस तोड होती आणि त्याचबरोबर चांगल्या स्वभावाची देणगी तिला मिळाली होती. आपल्या बुद्धीचा किंवा रूपाचा तिला गर्व नव्हता. त्यामुळे तिला राधिकापेक्षा जास्त मित्रमैत्रिणी मिळाले होते. याचा राग मनात धरून सानिकाला दुखावण्याची एकही संधी राधिका सोडत नव्हती.
पुढील स्लाइडवर वाचा, आणि सानियाचा एकाएकी हिरमोड झाला...