आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्राहकांना स्वस्तात माल मिळावा, हेच धोरण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सॅम वॉल्टन यांनी जेव्हा पहिले वॉलमार्ट स्टोअर सुरू केले तेव्हा त्यांना माहीत नव्हते की, ते अशा एका अमेरिकन संस्थेची स्थापना करीत आहेत जी किरकोळ विक्रीच्या व्यवसायाला नवे स्वरूप देईल, त्यामुळे अमेरिकेचा चेहरामोहराच बदलून जाईल. त्यांनी केवळ किरकोळ विक्री करणार्‍या कंपन्यांना पुरवठ्याची साखळी हाताळण्याचे नवे मार्गच दाखवले नाहीत तर त्यांच्याशी सतत सहकार्य निर्माण करण्याची एक यंत्रणाही उपलब्ध करून दिली. त्यांची भूमिका नेहमीच कमी किमतीत माल देण्याची होती. त्यांना माहीत होते की, दैनंदिन गरजेच्या वस्तू इतरांपेक्षा कमी किमतीत दिल्या तर त्यांना नक्कीच यश मिळेल. त्यांनी इतरांप्रमाणे वर्षातून एक-दोन वेळा एखादी स्कीम देण्यापेक्षा दररोज ग्राहकांना योग्य किमतीत माल देण्यावर भर दिला. त्यांनी टूथपेस्ट, टॉयलेट पेपर आदी सामानासाठी कमी किमतीचे खास धोरण राबवले, त्याला सगळ्या मोठ्या स्टोअर्सनी अंगीकारले.

वॉल मार्ट यांनी 52 वर्षांपूर्वी ‘सगळे काही एकाच ठिकाणी’ ही विक्रीची नवी पद्धत सुरू केली. त्या काळी जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तीनेही हा विचार केला नसावा की, एकाच दुकानात गरजेच्या सगळ्या वस्तू मिळू शकतील. वॉलमार्टमधील वस्तू अत्यंत स्वस्त होत्या. यामुळे लोकांनी गरज नसतानाही बर्‍याच वस्तू खरेदी करणे सुरू केले. त्यामुळे अमेरिकेत खराब झालेल्या वस्तू दुरुस्त करण्याचा उद्योग पूर्णपणे नष्ट झाला. वॉल मार्टमध्ये कामगारांसाठी विशिष्ट धोरण ठरलेले होते. जसे दर शनिवारी सगळ्या कामगारांची सकाळी 7.30 ला एक बैठक घेतली जात असे. जगातील सर्वात मोठे कॉर्पोरेशन बनल्यानंतरही कंपनीने आपले हेच धोरण कायम ठेवले. 1992 मध्ये सॅम वॉल्टन यांच्या मृत्यूनंतरही या धोरणावर विशेष लक्ष ठेवले जात आहे.

केवळ एवढेच नव्हे तर वॉलमार्ट ही पहिली अशी कंपनी होती, जिने ग्राहकाचे वर्तन समजून घेण्यासाठी माहिती आणि तंत्रज्ञानाचा आधार घेतला होता. त्यांनी 1985 मध्ये चीफ लेफ्टनंट डेव्हिस ग्लास यांच्या सहकार्याने एक रिटेल लिंक प्रोग्रॅम तयार केला होता. त्यानुसार जिथे-जिथे वॉलमार्ट स्टोअर होते तेथे संचालकाला एकेका ग्राहकाशी थेट जोडण्यात आले, ही बाब कंपनीचे वेगळेपण सिद्ध करणारी ठरली. उत्तम पुरवठा व्यवस्था अन् कमीत कमी नुकसान या दोन प्रमुख कारणांमुळे ही कंपनी 2005 मध्ये जगातली सर्वोत्तम कंपनी ठरली होती.

वॉलमार्ट स्टोअर जगातील एक सर्वोत्तम अमेरिकन मल्टिनॅशनल रिटेल कॉर्पोरेशन
संस्थापक - सॅम वॉल्टन
स्थापना - 1962, रोजर्स आर्क अमेरिका
प्राथमिक उत्पादन - इलेक्ट्रॉनिक, ग्रॉसरी, सॉफ्टगुड्स, हार्डगुड्स