आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मूड बदलायचाय? तर ‘अ‍ॅक्ट-फास्ट’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बदल घडताना निराश होणे, मूड खराब होणे, औदासीन्य येणे या सामान्य गोष्टी आहेत. परंतु ‘अ‍ॅक्ट फास्ट’ च्या (तत्काळ कृती)मदतीने तुम्ही काही क्षणांत मूड बदलू शकता. ‘अ‍ॅक्ट’ तुम्हाला मानसिक परिस्थितीवर मात करण्यासाठी सज्ज करते. तर ‘फास्ट’ काम कसे करावे, याची माहिती देते. अ‍ॅक्ट फास्टची सातही अक्षरे काहीतरी सांगतात. त्याविषयी...
अ‍ॅग्री (मान्य करा) - समजा तुमची नोकरी गेली. पुढे काय? हा विचार करून तुम्हाला राग येईल. तुम्ही स्वत:ला सांगा, ठीक आहे. यापुढे मी या परिस्थितीला आणखी घाबरणार नाही. म्हणजेच प्रत्येक परिस्थितीसाठी स्वत:ला तयार करा.
क्लॅरिफाय (ठरवा)- तुम्हाला कुठे जायचे आहे ते निश्चित करा. म्हणजे त्यावर तुम्हाला लक्ष केंद्रित करता येईल. तुमच्या मूडची एक किंवा दोन शब्दांत व्याख्या करा. तो सक्षम, आत्मविश्वास काहीही असू शकतो. तुम्ही म्हणाल की मी सक्षम आहे. तर मी का म्हणून घाबरू?
टेक रिस्पॉन्सिबिलिटी (जबाबदारी घ्या) - कोणत्या गोष्टी टाळाव्यात आणि कोणत्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करावे हे तुम्हाला माहीत आहे. आता वास्तवाचा सामना करा. कोणाला दोष देऊ नका. तुमच्या मदतीसाठी कोणी पुढे येणार नाही. तुम्हालाच तुमची मदत करावी लागणार आहे.
फोकस (लक्ष केंद्रित करा) - लक्ष कशावर केंद्रित करायचे, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. याचे उत्तर मिळाल्यावर तुम्ही मानसिक आणि भावनात्मक ऊर्जेने भारावून जाल. नोकरी करणा-या ंचे उदाहरण घेऊ. तुम्ही जुन्या संपर्कांविषयी विचार करता आहात? नव्या करिअरच्या संधी शोधत आहात? डोक्यात येणारे प्रश्न आणि उत्तरे कागदावर लिहून काढा. त्याने मदत होईल.
अ‍ॅक्ट (कृती) - आता तुम्हाला काय करायचे आहे हे माहीत आहे. निराश आहात आणि तुम्हाला आनंदी व्हायचे असेल तर स्वत:ला प्रश्न विचारा की, तीन लोकांची तुम्ही कशा प्रकारे मदत करू शकता? कृती करणे सर्वात महत्त्वाची बाब आहे.
सराउंडिंग (सभोवतालचे वातावरण) - मूड बदलायचा असेल तेव्हा या संकल्पनेकडे बहुतेक वेळा दुर्लक्ष केले जाते . तुमच्या सभोवतालचे वातावरण मूड बदलण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडत असते. त्याविषयी तुम्ही विचार करत नसाल तर त्यातील ऊर्जा गमावता आहात. तुमच्या चहुबाजूंचे वातावरण अशा प्रकारे व्यवस्थित करून घ्या, जेणेकरून तुम्हाला त्यातून बळकटी मिळेल. यामुळे तुमचा मूड बदलू शकतो.
टेल (सांगा)- या स्थितीत सर्वच गोष्टी एकत्रित होतात. तुम्ही स्वत:ला काय सांगितले पाहिजे, हे या स्थितीत तुम्हाला कळते. त्यामुळे तुमचा मूड सुधारण्यास मदत होते.