Home »Divya Marathi Special» Watch On Banking Scams

बॅँकिंग घोटाळ्यांवर बारीक लक्ष

राना फोरूहर | Jan 06, 2013, 03:59 AM IST

  • बॅँकिंग घोटाळ्यांवर बारीक लक्ष

आर्थिक संकटाच्या काळात जवळपास दरमहिन्याला नवीन घोटाळे उघडकीस येत आहेत. ब्रिटिश बॅँक एचएसबीसीने नुकतेच मेक्सिकन तस्करांतर्फे बॅँकेच्या माध्यमातून अमेरिकेत पैसे पाठवल्याबद्दल 1.9 अब्ज डॉलरचा दंड भरण्याची तयारी दर्शवली आहे. यानंतर लंडनमधील काही व्यापा-यांना व्याजदरात फेरफार केल्याच्या संशयावरून अटक करण्यात आली. यातील एक व्यापारी स्विस बॅँक यूबीएस आणि सिटी ग्रुपसाठी काम करत होता. घोटाळ्यांविरोधात कडक कारवाई करण्यात अमेरिकी कमोडिटी फ्यूचर्स ट्रेडिंग कमिशन (सीएफटीसी)चे अध्यक्ष गॅरी गेन्सलर यांची मुख्य भूमिका आहे.
निर्ढावलेल्या बॅँकरमध्ये वचक निर्माण करणारे 55 वर्षीय गेन्सलर हे हसतमुख आणि सामान्य कुटुंबातील आहेत. सीएफटीसीचे अध्यक्ष असल्याने सर्वाधिक जोखीम असलेल्या व्यवहारांवर त्यांची नजर असते. सध्या गेन्सलर लिबोर व्याजदर घोटाळ्याच्या चौकशीचे सर्वेसर्वा आहेत. एका बॅँकेतर्फे दुस-या बॅँकेकडून घेतल्या जाणा-या व्याजदराला लंडन इंटरबॅँक ऑफर्ड रेट-लिबोर म्हणून संबोधले जाते. अनेक प्रकारचे व्याजदर निश्चित करण्यात याची महत्त्वाची भूमिका असते. अमेरिकी वायदे बाजारातील 70 टक्के देवघेवचे व्यवहार लिबोरच्या माध्यमातून केले जातात. 350 खर्व डॉलरचे करार आणि 10 खर्व डॉलरचे कर्ज याच्या अधिकारक्षेत्रात येतात.
लिबोरचे प्रमाण वास्तविकता दर्शवितो, अशी बाजारातील प्रत्येकाचीच धारणा आहे. गेन्सलर म्हणतात, ग्लोबल फायनान्शियल सिस्टिमची ही पायाभूत दरे आहेत. जर यांनाच चुकीचे सांगितले गेले तर बाजाराची विश्वासार्हताच नष्ट होईल. सीएफटीसीच्या चार वर्षांच्या चौकशीनंतर बार्क्लेजने मागील वर्षात 27 जूनला लिबोर दरामध्ये फेरफार झाल्याचे मान्य केले. त्याने 45 कोटी डॉलर दंडही भरला. लिबोर दरात घोटाळ्यासाठी सीएफटीसी व इतर अमेरिकी, युरोपियन नियंत्रक संस्था डझनावर ग्लोबल बॅँकांची चौकशी करत आहेत. अनेक बॅँकांनी दंड देण्यासाठी निधीही निश्चित केला आहे.
2009 मध्ये सीएफटीसीचे अध्यक्ष बनल्यानंतर गेन्सलरने लिबोर घोटाळ्याविरोधात अभियान सुरू केले आहे. याच्या एका वर्षापूर्वीच लिबोरमध्ये घोटाळ्याचे संकेत मिळत होते. वास्तविक यात घोटाळ्याची शक्यता दिसून येते. कारण व्यवहाराच्या वास्तविक दरांवर हे आधारित नाही. 20 ग्लोबल बॅँकांच्या एका पॅनलतर्फे दिलेल्या शक्यतेच्या आधारावर दर काढले जातात. एकप्रकारे लिबोरच्या माध्यमातून बॅँक कर्जाची पूर्तता करण्याच्या एकमेकांच्या क्षमतेवर विश्वास निश्चित करतात.
2008 मध्ये अर्थसंकट अधिक गडद होत असतानाही लिबोर दर वाढत नव्हते. संकटाच्या या काळात व्याजदर कमी असण्याचे कोणतेही ठोस कारण बॅँकांकडे नव्हते. एखाद्या बॅँकेने इतर बॅँकांकडून अधिक व्याजदराने कर्ज घेतले तर त्या बॅँकेची ढासळलेली परिस्थिती समोर येते. यामुळे कर्जाच्या व्याजदरांना कमी करत त्याचा प्रचार सुरू झाला. काही तरी गडबड असल्याचे अधिका-यांच्या गावी होतेच. 2008 मध्ये बॅँक ऑफ इंग्लंडचे गव्हर्नर मार्विन किंगने गमतीत म्हटले होते, लिबोर दरांच्या माध्यमातून बॅँका एकमेकांना कर्ज देत नाहीत तरीही अर्थसंस्थांच्या नियंत्रकांनी प्रकरणात हस्तक्षेप केला नाही, परंतु गेंसलर एकटेच कामाला लागले.
काही काळानंतर अमेरिकी आणि आंतरराष्‍ट्रीय संस्थांनीही पुढाकार घेतला. हजारो ई-मेलच्या चौकशीतून अनेक पुरावे मिळाले आहेत. अर्थपुरवठ्याच्या अंधा-या कोप-यात गेन्सलर यांनी आशेचा दीप प्रज्वलित केला आहे तरीही अमेरिकी संसद निधी देण्याबाबतीत सीएफटीसीवर उदार नाही. बॅँकिंग उद्योगाशी निगडित गट सीएफटीसीवर सतत दावे दाखल करत आहेत. अर्थ क्षेत्रात गेन्सलरने इतके शत्रू बनवले नसते तर ते एखाद्या मोठ्या पदावर आता निश्चितपणे विराजमान असते.

Next Article

Recommended