आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Water Saving Amazing Video Will Make You Cry For Water

मुर्दाड व्यवस्थेच्या मुस्काटात मारणारा पाणी बचतीचा VIDEO, बघाच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खरंच एखादा व्हिडिओ किंवा फोटो बरंच काही सांगून जातो. कारण त्यात एक मेसेज दडलेला असतो. तो मनाला आतुन-बाहेरुन पोखरुन टाकतो. विचार करायला लावतो. सध्या लातूरची ताहान भागवण्यासाठी मिरजेहून पाणी एक्स्प्रेस चालवण्यात येत आहे. पाणी पुरवठा करण्यासाठी सुरु करण्यात आलेली ही पहिलीच एक्स्प्रेस आहे. विशेष म्हणजे हे दुर्भाग्य पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या वाट्याला आले आहे. आम्ही मार मिरवतो, आमचा महाराष्ट्र पुरोगामी. आमचा महाराष्ट्र विकसित. आमची अर्थव्यवस्था पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेपेक्षा मोठी आहे. पण जेव्हा केव्हा आपण पाणी एक्स्प्रेस बघतो तेव्हा आपला बुरखा टराटरा फाटतो. महाराष्ट्राच्या सो कॉल्ड पुढाऱ्यांनी जनतेच्या तोंडावर विकासाच्या नावाखाली माखलेले शेण डोळसपणे दिसून येते. आपली आपल्याला लाज वाटते....
2005 मध्ये झालेल्या न्युयॉर्क एएमई फेस्टिव्हलमध्ये या शॉर्टफिल्मला सिल्व्हर मेडल मिळाले आहे, असे सोशल मीडियावर सांगितले जात आहे. हा व्हिडिओ सध्या पाणी संकटाच्या तोंडावर व्हायरल झाला आहे.... बघाच...
पुढील स्लाईडवर फोटोंच्या माध्यमातून जाणून घ्या काय आहे व्हिडिओत... अखेरच्या स्लाईडवर बघा व्हिडिओ....