आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शनीच्‍या चंद्रावर पाण्‍याचा समूद्र, पृष्‍ठभागापासून 18 ते 22 किमी आतमध्‍ये असण्‍याची शक्‍यता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्‍टन- सूर्यमालेतील गुरुनंतरचा सर्वात मोठा ग्रह शनिच्‍या एन्‍सीलॅडस चंद्राच्‍या पृष्‍ठभागाखाली पाण्‍याचा समूद्र असल्‍याचे नासाने जाहीर केले आहे. नासाच्‍या वेबसाईटवर यासंबंधी माहिती देण्‍यात आली आहे. नासाने म्‍हटले आहे की, एन्‍सीलॅडसच्‍या दक्षिण धुव्रीय प्रदेशामधील भूपृष्‍ठाखालील तापमान अपेक्षेपेक्षा जास्‍त आढळून आले आहे. या भागांत ही उब बाहेर येत असल्‍याने तेथील पृष्‍ठभागावर तडे गेल्‍याचे दिसत आहे. 
 
नासाने याला महत्‍त्‍वाचा पुरावा मानला असून शनिचा हा चंद्र भूशास्‍त्रीयदृष्‍टीया सक्रीय असल्‍याचे सांगितले आहे. यातील सर्वात महत्‍त्‍वाची बाब म्‍हणजे यामुळे शनिवर जीवन असण्‍याची शक्‍यता आणखी बळावली आहे. यापूर्वीही शास्‍त्रांनी एन्‍सीलॅडसचे वातावरण जीवनासाठी पोषक असून तेथे बॅक्‍टेरिया सारख्‍या सुक्ष्‍म जिवांचे अस्तित्‍व असण्‍याची शक्‍यता वर्तवली होती. 
 
शास्‍त्रज्ञांनी म्‍हटले आहे की, बाहेरून बर्फाळ कवचाने वेढलेल्या एन्सीलॅडसच्या आत उबदार समुद्र असून तो पृष्ठभागाच्या निकट असायला हवा. त्‍याच्‍या पृष्ठभागावरील उलथापालथीच्या खुणा पाहता आतील समुद्र वेळोवेळी आणि अनेक ठिकाणी बाहेर आलेला आहे असे स्पष्ट होते.
 
एन्‍सीलॅडच्‍या बर्फाळ कवचाची जाडी 18 ते 22 किमी आहे. मात्र दक्षिण धुव्रावर ही जाडी केवळ 5 किमी आहे. कॅसिनी या कृत्रिम उपग्रहाद्वारे मिळालेल्या माहितीतून हा तपशील उघडकीस आला आहे. भविष्‍यकाळातील उपग्रह मोहिमेतून या समुद्राचा अधिक अभ्‍यास होणार असून,  तेथे जीवांचे अस्तित्‍व आहे काय? जलरुपी समुद्राचे स्‍वरुप काय? इत्‍यादी प्रश्‍नांची उत्‍तरे मिळू शकतील, असे कॅसिनी प्रकल्‍पाच्‍या वैज्ञ‍ानिक लिंडा स्पिल्‍कर यांनी सांगितले आहे. 
 
पुढील स्‍लाइडवर पाहा, कॅसिनी उपग्रहाने टिपलेले एन्‍सीलॅडचे फोटोज... 
 
 
बातम्या आणखी आहेत...