आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

AMAZING WEBSITE: इंग्रजीची समस्‍या सोडवण्‍यासाठी...

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

www.howjsay.com : अनेकवेळा इंग्रजी शब्दाचे योग्य उच्चारण करण्याची समस्या निर्माण होते. तुम्हाला सुद्धा इंग्रजी उच्चाराची समस्या जाणवत असल्यास ही वेबसाइट फायद्याची ठरते. वेबसाइट वापरण्यास सोपी असून आपल्या हवा असलेल्या शब्द फक्त वेबसाइटवर टाइप करावा लागतो. शब्द टाइप करून सबमिट केल्यावर त्या शब्दाशी मिळते जुळते शब्द आणि त्याचे योग्य उच्चारण उपलब्ध होतात. जो शब्द तुम्ही टाइप केला असेल त्याचे उच्चारण गुलाबी रंगात दिसते. त्यावर क्लिक केल्यानंतर त्याचे योग्य उच्चारण तुम्हाला ऐकू येईल.

या संकेतस्थळाच्या डिक्शनरीमध्ये तब्बल दोन लाख शब्द आहेत. ज्या शब्दांचे स्पेलिंग माहिती नसेल असे शब्ददेखील आपल्याला शोधता येतात.