आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

AMAZING WEBSITE: विविध व्यंजनाचा आस्वाद घेणार्‍या खवय्यांसाठी...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

www.skinytast: विविध व्यंजनाचा आस्वाद घेणार्‍या खवय्यांसाठी ही वेबसाइट एक मेजवानी ठरेल. या वेबसाइटवर स्वादिष्ट आणि आरोग्यदृष्टीने हितकारी पदार्थांची रेसेपी उपलब्ध आहे. यावर दाखवण्यात आलेल्या रेसेपीमध्ये फॅटचे प्रमाण नियंत्रणात असते.जीना होमोल्का या ही वेबसाइट चालवतात. त्या प्रसिद्ध रेसेपी डेव्हलपर आणि फोटोग्राफर आहेत.घरच्या जेवणाप्रमाणे चव असलेल्या शेकडो रेसेपी या ठिकाणी उपलब्ध आहे.

प्रत्येक डिशमध्ये असणारी पौष्टिक तत्त्वे यात दाखवलेली असतात. नियमित नवनवी रेसेपी टाकून वेबसाइट अपडेट केली जाते. आपल्या आवडत्या रेसेपीला तुम्ही फेव्हरेट बॉक्समध्ये सेव्ह करू शकता. वेगवेगळ्या देशांमधील रुचकर पदार्थांची चव चाखायची इच्छा असल्यास एकवेळ अवश्य ही वेबसाइट पाहावी.