आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सावधान! ऑनलाइन लग्न ठरवताय? तत्पूर्वी हे अवश्य वाचा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘तो’ शादीशुदा हे साडीवाल्याकडून तिला कळले
‘नेव्हर मॅरिड’... त्याने वेबसाइटवर हे स्टेटस टाकले होते. तीदेखील ‘नेव्हर मॅरिड’ कॅटेगिरीमधली. दोघेही उच्चशिक्षित. ती पुण्याची, तो नाशिकचा. प्रसिद्ध मॅट्रिमोनियल वेबसाइटवर दोघांनीही नोंदणी केली होती. स्थळ जुळले. ऑनलाइन काँटॅक्ट झाला. प्रत्यक्ष भेटून पसंती झाली. घरच्यांच्या संमतीने लग्न ठरले. सर्वांच्या साक्षीनं मोठ्या थाटामाटात विनीता पाटील (नाव बदलले आहे) यांचे लग्न झाले. त्यानंतर दीड वर्ष सुखाचा संसारही. एक दिवस एक साडी विकणारा आला. त्याने विचारले, मिसेस पाटील कुठे गेल्या? ती म्हणाली, ‘मीच मिसेस पाटील.’ साडीवाला म्हणाला, असं कसं होईल, इथे मिसेस पाटील राहायच्या त्या वेगळ्या होत्या, त्या माझ्याकडून साड्या विकत घ्यायच्या म्हणून मी आलो. तिला वाटलं, साडीवाल्याचा काही तरी गोंधळ होतोय, पण त्यानं त्याला माहीत असलेल्या मिसेस पाटलांचा मोबाइल नंबरही दिला. तिने त्या नंबरवर फोन केला. समोरून आवाज आला, ‘मिसेस पाटील बोलतेय...’ त्या दोघी भेटल्या. तेव्हा तिला सारा उलगडा झाला.पोलिसांत तक्रार करून काहीही साध्य झाले नाही.

पुढे वाचा.... लंडनला पोहोचले अन् कळलं, त्याला ना घर ना नोकरी
बातम्या आणखी आहेत...