आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साप्ताहिक राशीभविष्य

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेष
खर्च होण्याची शक्यता जास्त आहे. केतूची गती आणि उच्च स्थानातील शनी तसेच राहूची दृष्टी पडल्यामुळे त्रास होऊ शकतो. शत्रू तसेच आजारात वृद्धी होऊ शकते. चंद्र द्वादश स्थानात असल्याने आठवड्याच्या सुरुवातीला त्रास होऊ शकतो. मधल्या काळात सुधारणा तर शेवटी लाभदायक स्थिती असेल.
व्यवसाय - हा आठवडा नोकरी व व्यापारासाठी चांगला आहे. गुंतवणूक फायदेशीर ठरेल.
शिक्षण - तंत्र आणि वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी शुभ. चांगले परिणाम मिळतील.
आरोग्य - आरोग्यासंबंधी समस्या निर्माण होतील. विशेषत: त्वचारोगासंबंधी
प्रेम - हा काळ योग्य नाही. जोडीदारासोबत ताणतणाव किंवा ताटातूट होऊ शकते.
हे करावे - पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था करा


कर्क
शनी वक्राकार स्थितीत असल्यामुळे साडेसातीमुळे पूर्वी जो त्रास झाला आहे, तो सध्या शांत होईल. कामे सहज पूर्ण होतील. सुखद बातमी मिळेल. विविध प्रकारची कामे करण्याची संधी चालून येईल. दूरदृष्टी ठेवल्यास फायदा होईल. जमीनजुमला, मालमत्तेतून फायदा होईल.
व्यवसाय - नोकरीत काही चढ-उतार येतील. कामे बदलल्यास निराशा येईल.
शिक्षण - अनेक कामे एकाच वेळी केल्याने हानी पोहोचेल. तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
आरोग्य - आठवड्याच्या उत्तरार्धात पाय दुखू शकतात. तसेच थकवा जाणवेल.
प्रेम- जोडीदाराशी एखाद्या गोष्टीवरून खटकण्याची शक्यता आहे.
हे करावे - मंगळवारी मारुतीजवळ दिवा लावा.


तूळ
वक्राकार तसेच उच्च् स्थानातील शनि आणि राहूची युती आहे. इतरांच्या भानगडीत पडू नका. एखाद्याचे भले करण्यास गेलात तर वाईटपणा येईल. व्यय होईल. तसेच उत्पन्न कमी होऊ शकेल. आईला आरोग्यासंबंधित समस्या उद्भवतील. न्यायालयासंबंधी खटले मजबूत होतील.
व्यवसाय - कठोर मेहनत घेऊनही अधिकारी असमाधानी असतील.
शिक्षण - तंत्र, वैद्यकीय, फार्मसी, लेखा, गणितातील विद्यार्थ्यांना यश मिळेल.
आरोग्य - कंबर आणि पायात वेदना जाणवतील. शरीरात अग्निदाह होण्याची शक्यता.
प्रेम - प्रेमप्रकरणात संयम ठेवा. जोडीदाराची वागणूक चिंतेत भर पाडेल.
हे करावे -कालीमातेचे दर्शन घ्या.


मकर
विचार न करता काम केल्याने त्रास होईल. एकच काम अनेक वेळा करावे लागेल. मोठ्याच्या सल्ल्यांकडे दुर्लक्ष करू नका. आठवड्याच्या मधल्या काळात त्रासातून मुक्ती मिळेल आणि आत्मविश्वास वाढेल. पराक्रमात वृद्धी होईल आणि विरोधकांचा पराभव करण्याची शक्ती मिळेल.
व्यवसाय - नव्या योजना कार्यान्वित कराल. नव्या संधी लाभ मिळवून देतील.
शिक्षण- मेहनत करणा-यांनासुद्धा अपेक्षित परिणाम मिळवणे कठीण जाईल.
आरोग्य - आरोग्यसंबंधी तक्रार उद्भवणार नाही. तणावामुळे डोके दुखेल.
प्रेम - जोडीदारासोबत चांगला
हे करावे - पीठाचे दान लाभदायक ठरेल


वृषभ
राशीतील सूर्य आणि मंगळाच्या युतीने यश मिळेल. विशेषत: सरकारी कामे मार्गी लागतील. प्रसिद्ध लोकांची भेट होईल. संपर्क वाढेल. जोडीदारासोबत अनुकूल वेळ घालवाल. प्रवासाचे योग आहेत. मित्र तसेच सहका-यांसोबत सौहार्दाची वागणूक असेल. अपत्यापासून लाभ तसेच सुखप्राप्ती होईल.
व्यवसाय - वरिष्ठांची शाबासकी मिळेल. नव्या जबाबदा-या येतील. व्यापारात लाभ होईल. गुंतवणूक लाभदायक.
शिक्षण - कष्ट घेतल्यास चांगले परिणाम मिळतील.
आरोग्य - थकव्यासारखा त्रास जाणवेल. आरोग्य उत्तम राहील.
प्रेम । आठवडा चांगला. वाद बाजूला सारून जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल.
हे करावे - हनुमानजीची आराधना करा.


सिंह
मंगळाच्या पूर्ण दृष्टीने आत्मविश्वासात वाढ होईल. मोठे काम मिळण्याची शक्यता. जमीनजुमल्याच्या प्रकरणात जुने कामे मार्गी लागतील. जोडीदारासोबत वैचारिक मतभेद होण्याची शक्यता. आई-वडिलांपासून सुख आणि सहयोग मिळेल. अज्ञात भयावर मात करण्यात यशस्वी व्हाल.
व्यवसाय - व्यापारासाठी चांगल्या संधी उपलब्ध होतील. नोकरीमध्ये पदोन्नतीचा योग.
शिक्षण- यश तुमच्या बाजूने असेल. चांगल्या मार्गदर्शकाशी संपर्क लाभदायक ठरेल.
आरोग्य - पोटासंबंधी किरकोळ समस्या उद्भवतील बाकी आरोग्य उत्तम.
प्रेम -प्रेम-प्रसंगापासून दूर राहणेच उत्तम राहील. जोडीदारासोबत तणाव होईल.
हे करावे - लक्ष्मीमातेचे पूजन-दर्शन लाभदायक.


वृश्चिक
ग्रह स्वामी मंगळच्या कृपेने जमिनीसंबंधी प्रकरणात फायदा होईल. आठवड्याच्या पहिल्या दोन दिवसात जे कार्य कराल त्यात यश मिळेल. त्यानंतरच्या दिवसामध्ये सावधगिरी बाळगणे हितकारक. विशेषत: वाहन चालवताना. आठवड्याच्या शेवटी नशीब तुमच्या बाजूने असेल आणि यश प्राप्ती होईल.
व्यवसाय - व्यापार आणि नोकरी या दोन्हीत लाभ मिळेल. दीर्घ गुंतवणूक हानिकारक ठरू शकेल.
शिक्षण -आराम किंवा विषय परिवर्तनचा विचार योग्य नाही.
आरोग्य - वातावरण बदलासंबंधी तक्रार उद्भवतील. डावा पाय दुखण्याची शक्यता
प्रेम - प्रेमप्रकरणात सावध राहा, यश धूसर आहे.
हे करावे - दुर्गामातेचे दर्शन करा.


कुंभ
अपेक्षापेक्षा जास्त यश मिळल्याने उत्साहात वाढ होर्इ्रल. कार्यक्षमतेत वाढ तसेच सप्ताहाच्या मध्यात धनलाभ होण्याची शक्यता. मुले तुमच्या मनासारखे वागतील.मित्रांना भेटण्याची संधी येईल. आपल्या कार्यासाठी दुस-यावर विसंबून राहणे कष्टदायक ठरेल. प्रवास लाभदायक ठरेल.
व्यवसाय - उशिरा घेतलेल्या निर्णयामुळे हानी होऊ शकते. विचार करून गुंतवणूक करा.
शिक्षण - क्षमतेनुसार यश मिळेल. योग्य मार्गदर्शन मिळाल्यामुळे आनंद होईल.
आरोग्य - आरोग्याची समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. त्यासाठी जास्त खर्च येईल.
प्रेम - प्रेमासाठी योग्य वेळ आहे. जोडीदाराचे सहकार्य मिळेल.
हे करावे - पक्ष्यांना बाजरीचे दाणे टाका.


मिथुन
बुध, गुरू आणि शुक्राच्या युतीमुळे या आठवड्यात उत्साह, धाडस आणि धर्मात वृद्धी होईल. प्रलंबित कार्य मार्गी लागल्याने आनंद मिळेल. जमीन खरिदीची योजना कराल आणि कामाचा विस्तार होईल. आठवड्याच्या शेवटी खर्चासंबंधी समस्या असतील. प्रवासाच्या योजनेमुळे त्रास होईल.
व्यवसाय - वरिष्ठांची मर्जी राहील.कामात बदल होण्याची शक्यता. आराम मिळेल.
शिक्षण - मोठ्या स्पर्धेत यशस्वी व्हाल. नवीन योजना पूर्ण होतील.
आरोग्य - आठवड्याच्या शेवटी आरोग्यासंंबंधी समस्या- ताप, सर्दी, खोकला होईल.
प्रेम - आपसातील समन्वयामुळे जोडीदार आनंदी राहील. प्रेमात यश मिळेल.
हे करावे - गरिबांना अन्नदान करा.


कन्या
चंद्राच्या कृपादृष्टीने आठवड्याची सुरुवात चांगली होईल. चांगली बातमी मिळेल व सहका-यासोबत चांगला ताळमेल राहील. अपत्यांकडून सहकार्य आणि लाभ होईल. मध्यकाळात संपत्तीसंबंधी अडचणी उद्भवतील. अचानक अनावश्यक कार्यात गुंतून पडण्याची शक्यता.
व्यवसाय - अनावश्यक चर्चेकडे लक्ष देऊ नका. अडचणी लवकर दूर होतील.
शिक्षण- मनाप्रमाणे यश मिळवण्यासाठी जास्त कष्ट करावे लागतील.
आरोग्य -खिन्न आणि व्यग्र रहाल. अ‍ॅसिडिटीसंबंधी तक्रारी उद्भवतील.
प्रेम - एकटेपणा जाणवेल. वियोगाचे दिवस आहेत. काही दिवसांनंतर आराम मिळेल.
हे करावे - गोमातेस चारा देणे फलदायी ठरेल.


धनू
अनावश्यक खर्चात वाढ होण्याची शक्यता. केतूची गती, उच्च् स्थानातील शनी आणि राहूच्या पूर्ण दृष्टीमुळे शत्रू आणि आरोग्यासंबंधी समस्यांत वाढ होण्याची शक्यता. चंद्र द्वादश स्थानात असल्यामुळे सुरुवातीला त्रास होईल. मधल्या काळात सुधारणा आणि अखेरीस लाभदायक स्थिती असेल.
व्यवसाय -गुंतवणुकीसाठी चांगली वेळ. नवीन व्यापाराच्या संधी मिळतील.
शिक्षण - स्पर्धेसाठी जास्त कष्ट करण्याची तयारी ठेवा. पुरस्कारप्राप्तीची संधी.
आरोग्य - पोट, पायासंबंधी समस्या तसेच अधिक कामामुळे थकवा जाणवेल.
प्रेम - प्रेमप्रकरणापासून चार हात लांब राहा. जोडीदारासोबत चांगले सहकार्य राहील.
हे करावे - बजरंग बाणचा 11 वेळेस जप करा.


मीन
सप्ताहाचा प्रारंभ उत्तम राहील. धनलाभ होईल. समस्यापासून दूर राहाल. मन प्रसन्न राहील. कार्ये वेळेवर पार पडतील. तसेच मोठ्या प्रकल्पांमध्ये चांगले यश मिळेल. निर्मितीसंबंधी प्रकरणांत समस्या उद्भवू शकतील. दुस-यावर अधिक विश्वास नुकसानकारक राहील.
व्यवसाय - गुंतवणुकीसाठी वेळ योग्य नाही. तज्ज्ञांचा सल्ला घ्या. स्थलांतरणाची शक्यता
शिक्षण - कष्ट करण्याची प्रेरणा मिळेल. परीक्षांसाठी उत्तम वेळ आहे.
आरोग्य - डोके, डोळ्यांसंबंधी समस्या उद्भवण्याची शक्यता. खानपानात सावधगिरी बाळगा
प्रेम - प्रेमप्रकरणात यश मिळेल. जोडीदारासोबत चांगला ताळमेळ राहील.
हे करावे - शिव-पार्वतीचे दर्शन लाभदायक.