आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Weekly Maharashtra Review For Social, Political And Crime

मागोवा महाराष्‍ट्राचा: राजकीय नेत्‍यांच्‍या नावानं चांगभलं...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय जनता पक्षाचे महाराष्‍ट्राचे नूतन आणि उमदे अध्‍यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी राज्‍यात केंद्राच्‍या धर्तीप्रमाणे महाराष्‍ट्र लोकशाही आघाडीची (एमडीए) स्‍थापना करण्‍यात येणार असल्‍याची नवी संकल्‍पना बोलून दाखवली. फडणवीसांच्‍या या वक्‍तव्‍यामुळे राज्‍यात नवीन राजकीय समीकरण सुरू होण्‍याचे संकेत मिळाले आहेत. पण आता एमडीएच्‍या आघाडीत कोणकोणते पक्ष एकत्रित येतील हे पाहणे औत्‍सुक्‍याचे ठरेल. राष्‍ट्रवादीने तर लगेच या प्रयोगावर टीका केली. एकीकडे पक्षाचे अध्‍यक्ष नवा प्रयोग करण्‍याच्‍या तयारीत असताना. राज्‍याचे दुसरे नेते मधु चव्‍हाण यांच्‍यावर मात्र याचवेळी बलात्‍काराचा आरोप होताना दिसला. त्‍यामुळे पक्षाची प्रतिमा सुधरवण्‍यास निघालेल्‍या फडणवीसांसमोर ही नवीन समस्‍याच निर्माण झाली. दुसरीकडे कॉंग्रेसच्‍या एनएसयूआयचे मुंबईचे अध्‍यक्ष सुरजसिंह ठाकूर यांना संघटनेच्‍या कार्यक्रमात कपडे काढून नृत्‍य केल्‍याच्‍या आरोपावरून पदावरून पायउतार व्‍हावे लागले.

गेल्‍या 94 दिवसांपासून संपावर असलेल्‍या प्राध्‍यापकांना हायकोर्टाने कामावर रूजू होण्‍याचे आदेश दिले आहेत. हायकोर्टाच्‍या या आदेशामुळे सरकारचे आणि विद्यार्थ्‍यांचा जीव भांडयात पडला आहे. आपल्‍या मागणीसाठी विद्यार्थ्‍यांना वेठीस धरणा-या प्राध्‍यापकांनी सरकारची डाळ शिजू दिली नव्‍हती. शेवटी हायकोर्टाने त्‍यांना आदेश दिला. भ्रष्‍टाचाराची रोज एक पोलखोल करणारे भाजपचे किरीट सोमय्या यांनी पुन्‍हा एकदा छगन भुजबळ यांना निशाण्‍यावर घेतले आहे. चिखलीकरांच्‍या चौकशीत रोज कोट्यवधी रूपयांची मालमत्ता बाहेर येत असताना. सोमय्यांनी आता थेट भुजबळ यांच्‍या कार्यालयावरच आरोप केला आहे. त्‍यांच्‍या कार्यालयातील साधा कनिष्‍ठ अभियंता मर्सिडीज बेंझमधून कसा फिरतो, आणि त्‍याच्‍या नावे असलेल्‍या बेहिशेबी मालमत्तेचा पाढाच त्‍यांनी पत्रकारांसमोर वाचून दाखवला. एकंदर मागील आठवडयातील घटनांवर नजर टाकल्‍यास आपल्‍याला लक्षात येईल की, प्रत्‍येक क्षेत्रात राजकीय नेत्‍यांनी आपल्‍या गैरवतुर्णकीने ठसा उमठवला आहे. गत आठवडयातील अशाच काही घटनांचा वेध घेण्‍यासाठी क्लिक करा पुढच्‍या स्‍लाईडला...