आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

SUNDAY SPL: दाभोळकरांना गोळ्या, टुंडाला मोगलाई बिर्याणी, आसाराम... राम राम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे प्रमुख डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची ऐन नारळी पौर्णिमेच्या दिवशी गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली. त्यांच्या हत्येने पुरोगामी महाराष्ट्राचे समाजमन ढवळून निघाले. त्यांची हत्या होऊ शकते हे वृत्तच अनेकांना पटणारे नव्हते. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी जोपासणारे दाभोळकर पुण्यातल्या कोणत्याही रस्त्यावर किंवा कार्यक्रमात अगदी सर्वसाधारण व्यक्तिप्रमाणे वावरताना नजरेस पडत. सध्याच्या मॉडर्न पुण्यात सायकल चालवित खादिच्या कपड्यांमध्ये दाभोळकर दिसले, की रस्त्यावरच्या अनेक माना त्यांच्याकडे आदराने वळत. मनातल्या मनात त्यांच्या कार्याला सलाम ठोकले जात. परंतु, अशा व्यक्तिचीही हत्या करावी, असे काहींना वाटत होते. यातच काहींच्या माथेफिरू वृत्तीचे दर्शन होते. आणि माथेफिरूंना शिक्षा करावी लागत नाही तर ती त्यांना आयतीच मिळते, हे आजवर इतिहासाने सिद्ध करून दाखविले आहे.

दुसरीकडे ज्याला भर रस्त्यात गोळ्या घालाव्या अशा अब्दुल करीम टुंडाने मोगलाई बिर्याणी खाण्याची फर्माईश पोलिसांकडे केली आहे. आता कसाबला बिर्याणी चारल्यावर याला बिर्याणी दिली नाही तर केवढा मोठा अन्याय होणार. नाही का... वादग्रस्त आसाराम बापूंवर पहिल्यांदाच बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. या ना त्या कारणाने कायम चर्चेत राहणारे आसाराम बापू यामुळे पुन्हा वृत्तपत्रांमध्ये छद्ममी हास्यासह झळकले आहेत. याच आठवड्यात बिहारमध्ये एक्स्प्रेसखाली आल्याने तब्बल ३७ भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे पुन्हा एकदा रेल्वेमंत्र्यांचा राजीनामा नित्यनियमाप्रमाणे मागण्यात आला. गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे पंतप्रधानपदाचे दावेदार नरेंद्र मोदी यांनी मागास मुस्लिमांना त्यांच्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला आहे. गुजरातचे मुस्लिम मला आपले समजतात तर देशातील मुस्लिमांनी मला आपले का समजू नये, असा जावईशोध त्यांनी लावला आहे. यावेळी रक्षाबंधनाचा सण चक्क दोन दिवस साजरा करण्यात आल्याने भाऊ-बहिणीच्या नात्याला व्यक्त करण्यास एक्स्ट्रा टाईम मिळाला.

या आणि इतर वृत्तासाठी वाचा या आठवड्याचा मागोवा... पुढील स्लाईडमध्ये वाचूयात टुंडाच्या मोगलाई बिर्याणीविषयी...