आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागोवा महाराष्ट्राचा : मनसे - राष्ट्रवादीच्या राजकारणात महाराष्ट्राने अनुभवला बिहार !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणसाला निवडणुकीची चाहूल अजून लागली नसली तरी, राजकीय पक्षांच्या नेत्यांना मात्र नक्कीच लागली आहे असे दिसते. कोणी दुष्काळाच्या नावावर तर, कोणी मत मगायाला नाही तर मत मांडायला आलो असे म्हणत, राज्याचा दौरा करत आहे. शिवराळ भाषा आणि जाळपोळ तोडफोड करुन वातावरण तापवले जात आहे. कारण काहीही असले तरी, राज्यातील जनता शहाणी आहे. ताकाला जाऊन भांडे लपविणे कोणालाच शक्य नाही.
अजित पवारांनी आगामी निवडणुकीत काँग्रेसपेक्षा जास्त जागा मिळाल्यातर मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचाच होईल असे आताच जाहीर केले आहे. त्यातच काँग्रेसच्या युवराजांनी मुंबईचा धावता दौरा केल्याने काँग्रेसही आगामी काळात कामाला लागेल असे वाटते.
एकीकडे राज्यात असा राजकीय धुराळा उडत आहे आणि त्याच बरोबर दलितांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांना लगाम लावणे गृहमंत्र्यांना शक्य होत नसल्याचे आरोप विरोधी पक्षाबरोबरच आघाडीतील सहकारीही करीत आहेत.

राज्यात जाळपोळ-तोडफोड आणि आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतानाच साहित्याच्या क्षेत्रात एक चांगली घटना नाशिकमध्ये घडली आहे. साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांचा शानदार सोहळ्यात प्रतिष्ठेचा जनस्थान पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.