आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्राच्या दृष्टीने मागील आठवडा राजकीय धुराळा उडवणारा ठरला. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद भुषवणा-या महाराष्ट्राच्या नितीन गडकरींना अचानक आपल्या पदावरून पायउतार व्हावे लागले तर दुसरीकडे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या शिवसेनाअध्यक्षपदाची जबाबदारी उद्धव यांच्यावर सोपवण्यात आली. अपेक्षेप्रमाणे हे होणारच होते. बाळासाहेबांच्या जयंतीदिनी उद्धव यांच्या राज्याभिषकाचे सोपस्कार पूर्ण करण्यात आले. पण आपले चिरंजीव आदित्य ठाकरेंना नेतेपदी नेमण्याची उद्धव यांची इच्छा तुर्तास अंतर्गत नाराजीमुळे बासनात गुंडाळून ठेवावी लागली. फेरीवाल्यांना मोर्चा काढाल तर मनसेशी गाठ आहे असा दम भरणा-या राज ठाकरेंची ही धमकी पोकळच ठरली. फेरीवाल्यांनी राज यांच्या नाकावर टिच्चून पोलिसांविरोधात मोर्चा काढला.
एकंदर मागील आठवडयात महाराष्ट्रात जरी शांतता असली तरी राज्यातील राजकीय वातावरण कमालीचे अस्वस्थ करणारे ठरले. अशाच काही निवडक घटनांचा घेतलेला हा आढावा...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.