आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागोवा महाराष्‍ट्राचाः विठ्ठल नामात वारकरी चिंब, राजकीय चिखलफेकीत भिजले नेते

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विठ्ठल नामाच्‍या गजरात लाखो वारकरी पंढरीच्‍या दिशेने निघाले आहेत. संत ज्ञानेश्‍वर माऊली आणि संत तुकाराम महाराजांच्‍या पालख्‍यांचेही पंढरीच्‍या दिशेने प्रस्‍थान झाले. महाराष्‍ट्र भक्तीरसात चिंब झाला असल्‍याचे प्रसन्‍न चित्र वारीमध्‍ये दिसून आले. मात्र, राजकीय नेते आरोप प्रत्‍यारोपांच्‍या चिखलफेकीत माखल्‍याचे चित्रही महाराष्‍ट्राने पाहिले. राष्‍ट्रवादी कॉंग्रेसने मुंडे घराण्‍यातील भांडणाचा राजकीय फायदा घेण्‍याचा प्रयत्‍न चालविला आहे. त्‍यामुळे आगामी निवडणुकीत मुंडे विरुद्ध मुंडे असे चित्र बीड जिल्‍ह्यात दिसणार आहे. तर पुरोगामी महाराष्‍ट्रात पित्‍यानेच गर्भवती मुलीची हत्‍या केल्‍याच्‍या घटनेने धक्‍का दिला. ही घटना नाशिकमध्‍ये घडली होती. जातीबाहेर या मुलीने लग्‍न केले होते. त्‍यावरुन समाजात हीन वागणूक मिळाल्‍यामुळेच मुलीच्‍या हत्‍या करण्‍याचे पाऊल या पित्‍याने उचलले. त्‍यानंतर नाशिकमध्‍येच जात पंचायतीच्‍या तालिबानी निर्णयाचा एक प्रकार उघडकीस आला. मुद्दा एकाच. मुलीने जातीबाहेर लग्‍न केले. या‍ची शिक्षा म्‍हणून संपूर्ण कुटुंबावरच बहिष्‍कार टाकण्‍याचे फर्मान जात पंचायतीने दिले होते. परंतु, ते झुगारुन या कुटुंबाने न्‍याय मागितला. या जात पंचायतीलाही कयद्यानेही चांगलेच फटकारले. ऐन दुष्‍काळात दुष्‍काळग्रस्‍तांची थट्टा करणारे वादग्रस्‍त वक्तव्‍य करुन वादात अडकलेले उपमुख्‍यमंत्री अजित पवार पुन्‍हा फॉर्मात आल्‍याचे दिसत आहे. वादग्रस्‍त वक्तव्‍यानंतर ते काही दिवस शांत होते. काकांनी त्‍यांना समज दिली होती. पण, त्‍यांची शाब्दिक फटकेबाजी सांगली महापालिकेच्‍या निवडणुकीत पुन्‍हा दिसली. कॉंग्रेसच्‍या नेत्‍यांना त्‍यांनी या निमित्ताने टार्गेट केले.

राज्‍यात घडलेल्‍या या घटनांचा एक संक्षिप्‍त आढावा घेऊया 'मागोवा महाराष्‍ट्राचा' या सदरातून...