आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Sunday Spl: वादांचा टिवटिवाट, राज ठाकरेंची गर्जना आणि महापूर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तेलंगणा राज्‍याला युपीएने हिरवा कंदील दाखविल्‍यानंतर राज्‍यात वेगळ्या विदर्भाची मागणी पुन्‍हा उफाळून आली. एकीकडे विदर्भवादी नेते वेगळ्या विदर्भाची मागणी करत असतानाच लेखिका शोभा डे यांनी मुंबई वेगळी करा, असे ट्विट करुन नव्‍या राजकीय वादाला सुरुवात केली. हा वाद शमला नाही तोच उद्योग मंत्री नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांनी गुजराती बांधवांबाबत केलेल्‍या ट्विटमुळे दुसराच वाद निर्माण झाला. एकीकडे राजकीय वाद निर्माण होत असताना विदर्भात भीषण पूरस्थिती निर्माण झाली. नागपूर आणि चंद्रपूरला सर्वाधिक फटका बसला. पावसाचा जोर ओसरल्‍यानंतरही चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्‍ह्यात पाणी रविवारपर्यंत पाणी ओसरले नव्‍हते. राज्‍यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावल्‍यामुळे मराठवाड्याला दिलासा मिळाला आहे. जायकवाडी धरणात पाणीसाठा वाढला. परंतु, समन्‍यायी पाणी वाटपाच्‍या मुद्यावर तोडगा न निघता 'आदर्श'च्‍या अहवाल दाबल्‍यावरुन निर्माण झालेल्‍या वादात विधीमंडळाच्‍या पावसाळी अधिवेशनाचा समारोप झाला.

राजकीय वादांनी राजकारण ढवळून निघत असतानाच मराठी चित्रपट 'दुनियादारी'ने इतिहास घडविला. हा चित्रपट सुपरडुपर हिट झाला. अजुनही चित्रपटाचे शो हाऊसफुल आहेत. ऍडव्‍हान्‍स बुकींगसाठी रांगा लागत आहेत. तर आता या चित्रपटाचे दिवसाला 710 एवढे विक्रमी शो होत आहेत.

राज्‍यातील या घडामोडींचा आढावा घेण्‍यासाठी क्लिक करा पुढील स्‍लाईडवर...