आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागोवा महाराष्‍ट्राचा: मान्‍सून आणि शरद पवारांच्‍या राजकारणाने राज्‍यात गडगडाट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मान्‍सूनच्‍या आगमनामुळे सुखावलेल्‍या महाराष्‍ट्राच्‍या जनतेला हा आठवडा तसा संमिश्र राहिला. या आठवडयात महाराष्‍ट्राला सर्वच क्षेत्रात धक्‍क्‍यांचा अनुभव घ्‍यावा लागला. यातील काही राजकीय तर काही कला क्षेत्रातील धक्‍के होते. पण या धक्‍क्‍यातही पावसाच्‍या शिडकाव्‍यामुळे दुष्‍काळाची झळा बसलेली जनता थोडी आनंदल्‍याची दिसली. उभरती अभिनेत्री जिया खानच्‍या आत्‍महत्‍येमुळे बॉलिवूडला एका चांगल्‍या कलाकाराला मुकावे लागले. अपयश पचवता आले नाही तर काय होते याचा प्रत्‍यय जियाच्‍या आत्‍महत्‍येमुळे पुन्‍हा दिसून आले. त्‍यातच भारतीय रिपब्लिकन पक्षाचे अध्‍यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आयपीएलचे माजी कमिशनर आणि संसदीय कार्य मंत्री राजीव शुक्‍ला यांनी पाकिस्‍तानला गोपनीय माहिती पुरवल्‍याचा गौप्यस्‍फोट करून खळबळच उडवून दिली. तसेच नक्षलवादी हे देशाचे मित्रच असल्‍याचे सांगून त्‍यांनी कडीच केली.

या आठवडयातील सर्वात मोठा धक्‍का दिला तो राष्‍ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्‍यक्ष शरद पवार यांनी. शुक्रवारी त्‍यांनी राज्‍यमंत्रिमंडळातील राष्‍ट्रवादीच्‍या सर्व मंत्र्यांना राजीनामा देण्‍यास सांगितले. त्‍यांच्‍या या कृतीमुळे अनेकांना योग्‍य तो संदेश गेल्‍याचे बोलले जात आहे. मंत्र्यांना राजीनामा देण्‍यास सांगितल्‍यामुळे सहकारी पक्ष कॉंग्रेस आणि स्‍वपक्षातील निष्क्रिय मंत्र्यांनाही योग्‍य तो संदेश पोहोचला आहे. रेसकोर्सवरून पवारांनी उद्धव ठाकरेंवर केलेली टीका त्‍यांना चांगलीच अंगलट आल्‍याचे दिसले. उद्धव यांनीही पवारांचा समाचार घेत लव्‍हासा आणि अजित पवारांच्‍या धरणात मुतण्‍याच्‍या बडबडीचा आहेर दिला. विद्यार्थ्‍यांच्‍या शैक्षणिक जीवनला कलाटणी देणारा दहावीचा निकालही शुक्रवारी लागला. गतवेळेपेक्षा यावेळेस पास होणा-यांचे प्रमाण वाढले आहे. त्‍यातही नेहमीप्रमाणे मुलींनी आघाडी घेतली आहे. महाराष्‍ट्रातील या आठवडयातील अशाच काही सुखद आणि अनपेक्षित धक्‍क्‍यांचा मागोवा घेण्‍यासाठी क्लिक करा पुढच्‍या स्‍लाईडला...