आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Weird Penalty For Children's In America For Their Mistakes

अमेरिकेत पालकांकडून मुलांना लाजिरवाण्या पद्धतीने शिक्षा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
घटना इतकी विचलित करणारी होती की, डिजिटल युगात अपमानजनक शिक्षेचे उदाहरण बनली. अमेरिकेच्या टेकोमा, वाॅशिंग्टनमध्ये एका पित्याने आपल्या १३ वर्षीय मुलीचे लांब केस कापले. ते फरशीवर पसरवले आणि व्हिडिओ बनवला. मित्राला केसांसह आपला फोटो पाठवण्याची ही तिला शिक्षा देण्यात आली होती.

मुलीच्या आत्महत्येची बातमी पसरल्यावर व्हिडिओ वायरल झाला. यूट्यूबवर व्हिडिओ पाहणाऱ्या लोकांनी त्या वडिलांवर फौजदारी खटला दाखल करण्याची मागणी केली. मात्र, सत्य अजूनच क्लिष्ट आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वडिलांनी व्हिडिओ सार्वजनिक केला नव्हता. तो तर मुलीला समज देण्यासाठी बनवला होता. मुलीने आपल्या मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर केला. त्यानंतर तो ऑनलाइन आला. या प्रकाराने मुलांच्या पालन-पोषणात शिस्त, शालीनता आणि तंत्रज्ञानाच्या ताकतीवर मोठा वाद झाला.

मुलाने आज्ञा न पाळणे ही आई-वडिलांसाठी राग, अपमानजनकपणा किंवा हताशपणा निर्माण करू शकते. या भावना शिस्त लावण्यासाठी प्रभावी उपाययोजना शोधण्याला प्रेरित करतात. आता चाबकाची जागा कॅमेऱ्याने घेतली आहे. नुकत्याच समोर आलेल्या मुलांच्या आणि तरुणांच्या व्हिडिओमध्ये त्यांना रस्त्याच्या कडेला फलक घेऊन उभे करण्यात आल्याचे दाखवले आहे. त्यात लाज वाटेल असे लिहिले आहे, जसे की, मी खोटारडा आणि चोर आहे. मोठा होताच मी जेलमध्ये जाऊ इच्छितो, मी अयशस्वितेकडे मार्गक्रमण करत आहे, मी स्वयंघोषित आहे.

अपमान सहन करणारी अनेक मुले रडतात.काही फलकांवर पालकांचा बचाव केला आहे. जसे की, एका १३ वर्षीय मुलीच्या फलकावर लिहिले होते की, मी स्वत:ला आणि आईला मान खाली घालायला लावले. अशा मुलांचेही अधिक व्हिडिओ आहेत की ज्यांना कमी गुण मिळाल्याने आणि त्यांचा आयपॅड हरवल्याने त्यांचे केस कापण्यात आले आहेत. एका वडिलांनी स्वत:च्या मुलाला नापास झालेले गुणपत्रक घेऊन कॅमेऱ्यासमोर उभे केले. जॉर्जिया राज्याच्या स्नेलविलेमध्ये हा प्रकार इतका प्रसिद्ध आहे की, एक न्हावी मस्तीखोर मुलांची म्हाताऱ्यांसारखी केशरचना करण्यासाठी प्रसिद्ध आहे.

या प्रकाराला विरोध सुरू झाला आहे. इलिनॉय राज्याचे लोकप्रतिनिधी शान फोर्ड या महिन्यात विधेयक मांडणार आहेत, ज्यात मुलांना अपमानित करणे, त्रास देणे किंवा त्यांना भावनात्मक आघात पोहोचवण्यासाठी सोशल मीडियाचा उपयोग करणाऱ्या आई-वडिलांना शिक्षा केली जाऊ शकेल.मनोवैज्ञानिक नोरमा साइमन म्हणतात, असे पालक हताश होऊन समस्या सोडवण्याची प्रयत्न करत आहेत, भलेही त्याचे समाधान नुकसानकारक का असेना.