आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विचित्र... थीम पार्कच्या सजावटीसाठी सागरी प्राण्यांना चक्क गोठवून ठेवले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जपानमधील ‘स्पेस वर्ल्ड थीम पार्क’मध्ये जास्तीत जास्त लोकांना आकर्षित करण्यासाठी चक्क सागरातील जिवंत प्राण्यांना गोठवून त्यापासून सजावट करण्यात आली. यासाठी कर्मचाऱ्यांनी पाच हजारांहून अधिक सागरी जीवांचा वापर केला. त्यांना बर्फात दाबून, गोठवून ठेवले आणि या सजावटीला ‘फ्रीझिंग पोर्ट’ असे नाव दिले.
स्थानिकांनी थीम पार्क प्रशासनाला प्राण्यांचा अशा प्रकारे वापर केल्याबद्दल जाब विचारला. लोकांच्या मागणीवरून ही सजावट काढण्यातही आली. थीम पार्कने सुरुवातीला याच सजावटीचा वापर प्रचारासाठी केला होता. जगात पहिल्यांदाच सागरी प्राण्यांपासून बनलेले आइस रिंग पाहण्याची संधी.. अशी जाहिरात त्यांनी केली होती. मात्र, स्थानिक लोकांनी प्रत्यक्ष तसेच सोशल मीडियावर अशा प्रकारच्या वर्तणुकीवर प्रचंड संताप व्यक्त केला.
}tokyoreporter.com
बातम्या आणखी आहेत...