आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिरंतन: त्रिनेत्र, त्रिशूल व नंदीचा खरा अर्थबोध

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या परंपरेत भगवान शिवाला अनेक वस्तूंनी सजवलेले दाखवले जाते. वास्तवात या प्रतीकात्मतेचे अनेक सखोल संदर्भ आहेत. ते आपल्यासाठी सूचक आहेत. शिवाला त्र्यंबक संबोधण्यात येते. कारण त्यांना तिसरा डोळा आहे. तिसरा डोळा म्हणजे कपाळावर याचे स्थान असून त्यातून कोणती ऊर्जा येते, असे मुळीच नाही. याचा अर्थ केवळ बोध व अनुभवाचा एक वेगळा आयाम असणे आहे. तो आयाम आपल्याला दिशा देणारा आहे. दोन डोळे केवळ भौतिक वस्तूंना पाहू शकतात. या डोळ्यांना बंद केले तर आपल्याला काहीच दिसत नाही. तिसरा डोळा म्हणजे बोध करण्याचा एक दुसरा आयाम खुला असणे, जो अंतरात पाहू शकतो. बोध करण्याची क्षमता वाढवण्यासाठी तुमची ऊर्जा विकसित झाली पाहिजे. योगसाधनेची ही प्रक्रिया आहे. यात ऊर्जेचा विकास होतो. तुम्हाला भौतिकापल्याडच्या जाणिवा यातून होतात. तिसरा डोळा याच बोधात्मकतेला विकसित करण्यासाठी आहे.

पुढे वाचा... त्रिशूल जीवनातील मूळ ३ पैलूंना दर्शवते