आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

व्हिडिओतील निरागस सिरियन वेदनेचा चेहरा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेल्या पाच वर्षांपासून युद्धग्रस्त सिरियात जीव वाचविण्यासाठी इतस्ततः पळणारे लोक हे एक सामान्य दृश्य झाले आहे. १७ ऑगस्टला अलेप्पोतील मीडिया सेंटरद्वारा सादर केलेल्या ३७ सेकंदांच्या व्हिडिअोने जगभराचे लक्ष आपल्याकडे वेधले आहे. रुग्णवाहिकेत बसलेल्या एका पाच वर्षीय मुलाच्या चेहऱ्यावर भीतीची रेषा स्पष्ट दिसत आहे. तो अगदी स्तब्ध आणि भेदरलेला आहे. तो धुळीने-जखमांनीही माखलेला आहे. त्याच्या चेहऱ्याचा डावा भाग रक्ताने ओला-माखलेला आहे.

त्याचे नाव ओमरान दकनीश आहे. त्याला काही लोकांनी अलेप्पो शहरातील बॉम्बफेकीने उद्ध्वस्त झालेल्या एका इमारतीच्या बाहेर काढले होते. व्हिडिओ क्लिपिंग दाखवते आहे की, पिवळे जॅकेट घातलेला एक जण ओमरानला आपल्या कुशीत घेऊन जात आहे. मुलानेही त्या व्यक्तीच्या खांद्यावर आपला डावा हाथ लपेटून ठेवला आहे. रुग्णवाहिकेच्या आत गेल्यानंतर तो बाहेरच्या बाजूला पाहतो. तो नारंगी रंगाच्या सीटवर एकटाच बसला आहे. मुलाला आणणारा वॉकीटॉकी घेऊन तिथून निघून जातो आहे. एक अन्य कॅमेरा घेऊन मुलांवर लक्ष केंद्रित करतो आहे. त्याचा डावा डोळा पूर्ण उघडा असून दुसरा अर्धखुला असा आहे. तो रुग्णवाहिकेच्या दरवाजाच्या बाजूस पाहतो आहे. त्याचे लक्ष आवाजाकडेच आहे.

दहशतीने भेदरलेला मुलगा आपला उजवा हात चेहऱ्याजवळ आणतो. बोटे केसांमध्ये फिरवतो आणि पुन्हा चेहऱ्यावरून हात खाली ठेवतो. ३७ सेकंदांचा हा व्हिडिओ बंडखोराच्या कब्जातील उत्तरी शहरात सिरियाई सरकार वा रशियन विमानांच्या हवाई हल्ल्यानंतरची उद्ध्वस्तता दर्शवते आहे. मुलाचे छायाचित्र आणि व्हिडिओ फुटेज काही तासांच्या आत ऑनलाइन व्हायरल होऊन जातात. एपीने व्हिडिओ बनविणाऱ्या या छायाचित्रकाराचे नाव महमूद रसलान असे सांगितले. ओमरानला तीन अन्य मुले आणि आई-वडिलांसह इमारतीच्या बाहेर काढले गेले होते. कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही.

ओमरानच्या छायाचित्राने त्वरित सिरियन कुर्दिश मुलगा एलन कुर्दीची आठवण दिली. साधारणत: एक वर्षापूर्वी तुर्कीच्या समुद्रकिनाऱ्यावर लाल टी शर्ट आणि निळ्या रंगातील शॉर्ट््स घातलेला एलन तोंडावरच पडला होता. युरोपात शरणार्थींच्या थापेला-हाकेला आवाजादरम्यान हे छायाचित्र ऑनलाइन व्हायरल झाल्यानंतर उत्तम जीवनाच्या शोधार्थ पळणाऱ्या व प्राण गमावणाऱ्या शेकडो लोकांच्या व्यथेने जगाचे लक्ष वेधले होते. एलन आणि ओमरानच्या छायाचित्रात सारखेपणा आहेच- असहाय स्थितीत अडकलेले मूल आदी कारणामुळे ते दोघे मुले छायाचित्राच्या माध्यमातून संकटाचे त्रस्तपणाचे प्रातिनिधिक चेहरे बनले आहेत. शेवटी अॅलन एक मृत शरणार्थी, तर ओमरान युद्धात फसलेल्या हजारो मुलांमधील एक.

ओमरानवर फोकस केल्यानंतर त्याच फुटेजमध्ये गुलाबी कपडे घातलेली एक मुलगी रुग्णवाहिकेत दिसते आहे. तिच्यासह एक मुलगाही येतो. त्यानंतर इमारतीमधून रक्ताने चिंब झालेल्या एका व्यक्तीस बाहेर काढले जाते. त्याच्या येण्यानंतर रुग्णवाहिकेचे दरवाजे बंद होतात. व्हिडिओच्या शेवटी ढिगाऱ्याखालून काढलेल्या एका व्यक्तीला स्ट्रेचरवर घेऊन जाताना दर्शवतात. सिरियात भीषण उद्ध्वस्ततेची छायाचित्रे आणि फुटेज आता सामान्य होऊन बसले आहे. इमारतीच्या मलब्याच्या ढिगाऱ्याखालून रक्ताने माखलेली जखमी मुले काढली जात आहेत. मृतदेहांचे ढीग लागताहेत. पुढला येणारा दिवस काही आणखीनच वेगळे उद्ध्वस्तपण घेऊन येतो. पण ओमरान अद्वितीय आहे. तो जिवंत आहे.
बातम्या आणखी आहेत...