आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजार नेमका कुठे,हे राहुलना ठाऊक आहे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


2004 मध्ये काळ अनुकूल होता. एनडीएविरोधी वातावरण होते. आई सोनिया गांधी काँग्रेस अध्यक्ष होत्या. राहुलसुद्धा राजकारणात उतरले. अमेठीतून निवडणूक लढवून लोकसभेत गेले. मंत्री बनण्याचा दबाव आला, बनले नाहीत. पक्ष सावरण्याचा आणि विस्तारण्याचा ध्यास होता. प्रयत्न पण केला, पण अपयशी ठरले. उत्तर प्रदेश आणि बिहारच नव्हे, इतर अनेक राज्यांच्या विधानसभा निवडणुकांत सक्रिय सहभाग घेतला. प्रचारमोहिमांचे नेतृत्व केले, पण हरले. पराभवच होत राहिला. सलमान खुर्शीदसारखे मातब्बर नेते म्हणतात की, ‘पक्ष आणि देश राहुलकडे आशेने पाहत आहे, पण त्यांनी आतापर्यंत स्वत:ला छोट्या छोट्या भूमिकांमध्ये मर्यादित ठेवले आहे. साहजिकच आम्ही त्यांना आजपर्यंत पूर्ण पाहिलेच नाही. त्यामुळे ते काही चमत्कार घडवणार की नाही, हे आताच सांगता येणार नाही. ’

वचन असे दिले- राहुलना राजकारणात घराणेशाही नको आहे. त्यामुळेच त्यांनी युवक काँग्रेस आणि एनएसयूआयमध्ये लोकशाहीचा पाया रचला. मी गांधी कुटुंबातील असल्याने मला जास्त महत्त्व प्राप्त झाले, हे स्वीकारले. प्रत्येक मेहनती कार्यकर्त्याला संधी देण्याची माझी इच्छा आहे. उपाध्यक्ष झाल्यावरही म्हणाले, काम करेल तोच पुढे जाईल. नेतृत्वगुण विकसित करणार. देश चालवणारे एक नाही 40-50 नेते घडवणार. गेल्या 8-9 वर्षांत आईकडे पाहून असे जाणवले की, ताकदीसाठी पंतप्रधान होणे आवश्यक नाही. राहुल गांधींनी काँग्रेसला घराणेशाहीतून मुक्त केले तर तो एक चमत्कारच ठरेल.

अंमलबजावणीवर अवलंबून- ते काँग्रेस सत्तेवरही संतापले. सत्तेच्या विकेंद्रीकरणाची गरज असल्याचे त्यांनी म्हटले. तरुणांच्या आक्रोशावर चिंता व्यक्त केली. आजाराचे निदान तर केले, पण उपाय सांगितला नाही. उपाध्यक्षपद मिळाल्यावर त्यांच्या पहिल्या भाषणाने काँग्रेसवाल्यांचा उत्साह नक्की वाढला आहे. 2014 मध्ये चमत्कारिकरीत्या तो समोरही येऊ शकतो.