आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Why Bollywood Take Permission From Hollywood Before Move Remake

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विदेशी चित्रपटाच्या रीमेकपूर्वी परवानगी का घेतंय बॉलिवूड?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई/इंदूर- बॉलिवूडचे निर्माते आता हॉलिवूड चित्रपटांचे अधिकार खरेदी करूनच त्यांचा रीमेक करत आहेत. त्यांचा प्रामाणिकपणा वाढला असे नव्हे, तर दंडाच्या भीतीने ते असे करताहेत.

‘मर्डर-3’ या चित्रपटासाठी महेश भट्ट यांनी ‘ला कारा ऑकल्टा (द हिडन फेस)’ या स्पॅनिश थ्रिलर चित्रपटाचे अधिकार खरेदी केले. चित्रपटावरून वाद उद्भवू नये व कमाईही सुरक्षित राहावी हा त्यांचा उद्देश होता. टॉम क्रूझच्या ‘नाइट अँड डे’चे अधिकार घेऊनच दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद हृतिक रोशनसह चित्रपट करत आहे. विश्लेषक वजीरसिंह यांनी सांगितले की, सर्वच हॉलीवूड स्टुडिओजची कार्यालये मुंबईत आहेत. नक्कल लगेच पकडली जाते. त्यामुळेच ‘बर्फी’ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर पडावे लागले.

ट्रेड अ‍ॅनालिस्ट सुनील वाधवा यांनी सांगितले की, विदेशी चित्रपटाची कथा व दृश्ये कॉपी करणे, त्यांना भारतीय टच देण्याची युक्ती बॉलिवूड अनेक वर्षांपासून अवलंबत आहे. मात्र, जेव्हा हॉलिवूडच्या निर्मात्यांनी प्रचंड मोबदला मागायला सुरुवात केली तेव्हा भारतीय चित्रपट उद्योगाला आपल्या कार्यपद्धतीत बदल करावा लागला.

कृष्णधवलच्या काळात बजेटच्या दहापट क्लेम
ब्लॅक अँड व्हाइट चित्रपटांच्या काळात ‘कोहरा’ हा विश्वजितचा चित्रपट आला होता. तो ‘डेफ्ने डू मारियर्स रिबेका’चा रीमेक होता. इंग्रजी निर्माते कोर्टात गेले. केसदरम्यान त्यांना कळले की, चित्रपटाचे बजेट क्लेम केलेल्या रकमेचा दहावा भागही नाही. परिस्थिती लक्षात घेऊन त्यांनी केस मागे घेतली.

चोरीचा खटला दाखल होताच केली कंपनी बंद
निर्माते संजय गुप्ता यांनी ‘अ‍ॅसिड फॅक्टरी’ या चित्रपटाच्या वितरणाचे अधिकार महिंद्राची कंपनी मुंबई मंत्राला विकले. चित्रपट प्रदर्शित होताच हॉलिवूड थ्रिलर ‘अननोन’च्या निर्मात्याने गुप्तांसह महिंद्रावरही चित्रपटाचे कथानक चोरल्याचा आरोप केला. चित्रपटाच्या कथेची जबाबदारी निर्मात्यावर ढकलून महिंद्राने हात झटकले आणि कंपनीही बंद करून टाकली. चित्रपट पडला तेव्हा पेटंट कंपनीनेही केस मागे घेतली.

परदेशी चित्रपटाची कल्पना चोरण्याची शिक्षा
चित्रपट दंड (रु.) कुणाचा रीमेक हिट/फ्लॉप
नॉक आउट 80 लाख फोनबूथ सुपर फ्लॉप
बंदा ये बिंदास है 2 कोटी माय कझिन विनी डब्यात बंद
डॅडी कूल 50 लाख डेथ अ‍ॅट अ फ्यूनरल सुपरफ्लॉप
तीसमार खां 2 कोटी आफ्टर द फॉक्स फ्लॉप
याद रखेगी दुनिया 1 कोटी गीतांजली फ्लॉप