आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छोट्या कंपन्यांच्या समभागांची झपाट्याने विक्री का ?

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बाजारात होत असलेल्या प्रचंड उलाढालीमुळे गुंतवणूकदार लहान कंपन्यांमधून आपले लक्ष काढून घेत आहेत. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी ते मोठ्या कंपन्यांच्या समभागांवर लक्ष केंद्रित करत आहेत. त्यामुळे मागील 6-7 महिन्यांत मुंबई शेअर बाजारात लहान कंपन्यांचा(स्मॉल कॅप)निर्देशांक 16 टक्के तर मध्यम कंपन्यांचा (मिड कॅप)निर्देशांक 15 टक्क्यांनी वाढला आहे. तर मोठ्या कंपन्यांच्या (लार्ज कॅप) निर्देशांकात 1.3 ते 4 टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे.


व्यापारातील घट हे या घसरणीमागील प्रमुख कारण मानले जात आहे. रुपयाचे अवमूल्यन आणि अमेरिकेतील चलन अस्थैर्यामुळे बाजारात भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे गुंतवणूक दार योग्य पाऊल उचलत आहेत. प्रतिकूल परिस्थितीत मोठ्या कंपन्या तरून जाऊ शकतात. त्यामुळेच गुंतवणूकदार त्यात गुंतवणूक करत आहेत. छोट्या कंपन्यांचे शेअर्स झपाट्याने विकले जात आहेत. याचाच अर्थ त्यांचे शेअर्स स्वस्त आहेत. त्यामुळे लहान आणि मध्यम कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याची ही योग्य वेळ असल्याचे म्युच्युअल फंड व्यवस्थापकांचेही मत आहे. म्हणूनच अनेक जण क्लोज एंडेड इक्विटी फंड स्कीम (ठरावीक मुदतीच्या योजना) सुरू करत आहेत. अशा कंपन्यांकडून परतावे मिळण्यासाठी वेळ लागू शकतो, त्यामुळेच या फंड्समध्ये ठरावीक कालमर्यादा (लॉक इन)देण्यात आली आहे. यात गुंतवणूकदारांना त्या ठरावीक कालावधीपर्यंत पैसा ठेवावाच लागतो. त्यामुळेच छोट्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणा-या क्लोज एंडेड स्कीमची सध्या बरसात होत आहे. काही फंड कंपन्यांनी अशा योजना बाजारात आणल्या आहेत, तर काही सेबीच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. यातील बहुतांश योजनांमध्ये तीन ते पाच वर्षांचा लॉक इन आहे. तरीही गुंतवणूकदारांना बाजारात नोंदणीकृत असलेले युनिट्स विकता येतील. क्लोज एंडेड योजनांमधील युनिट मर्यादित कालावधीसाठी विकले जाऊ शकतात. तसेच ठरावीक कालमर्यादा संपेपर्यंत तो पैसा फंड हाऊसकडून पुन्हा घेता येत नाही. स्मॉल व मिड कॅप फंड्स वेगाने वाढत आहेत. अशा योजनांचा बाजार तेजीत असताना गुंतवणूकदार नफा वसूल करतात, असे अनेकदा दिसून आले आहे. यात ही संधी न साधणा-या गुंतवणूकदारांचे नुकसान होते. तसेच या योजनेत व्यवस्थापकांच्या दीर्घकालीन खरेदीवरही मर्यादा असतात.


क्लोज एंडेड फंडमध्ये अशी कोणतीही अडचण नसते. ठरावीक कालमर्यादेमुळे फंड व्यवस्थापकांना दीर्घकाळापर्यंत शेअर्स ठेवून घेण्याची संधी असते. त्यामुळे अशा स्वरूपाच्या योजनांत दीर्घकालीन गुंतवणूकदारांचा पैसा सुरक्षित राहतो. या योजनांत ठरावीक मुदत असल्याने जोखीम कमी होते, त्यामुळे फारसे घाबरून जाण्याचा धोका नाही. स्मॉल कॅप फंडात मात्र मुदतीच्या आत विक्री करणे सोपे नाही. तसेच ठरावीक कालमर्यादा असल्यामुळे पैसा परत घेताना कमी होण्याची शक्यता असते, ही खूप मोठी समस्या आहे. ओपन एंडेड फंडमध्ये (खुल्या मुदतीच्या योजना) पैसा परत मिळण्याची मागणी जास्त असते. त्यामुळे फंड्स व्यवस्थापकांना अगदी कमी अस्थिर असलेले शेअर्ससुद्धा तोट्यात विकावे लागतात.


स्मॉल व मिड कॅप फंड योजनांत गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदारांमध्ये संयम हवा. क्लोज एंडेड फंडमध्ये ठरावीक कालमर्यादेपर्यंत गुंतवणूकदारांचा पैसा सुरक्षित राहतो, हे निश्चित असते. तरीही एसआयपीचा (सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन-सिप) पर्याय नसेल तर योग्य लाभ मिळण्यासाठी योग्य वेळी गुंतवणूक करणे योग्य ठरेल. (मनी टुडे)