आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पती-पत्नीच्या नात्यात शिरजोर कोण?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कथा कधीच जुन्या होत नाहीत. रजिया सज्जाद जहीर यांची ‘सबसे बडा सौदागर कौन’ ही कथा वाचल्यानंतर मला याची जाणीव झाली. एखादी जुनी कथा, भाषाशैली, चरित्र कथानक इतका तजेलपणा कशी काय देऊ शकते, याचे मला आश्चर्य वाटले. कित्येक वर्षे उलटून गेल्यावरही साहित्य ताजेतवाने राहते, हे सत्य आहे.
या कथेचा सारांश फक्त इतकाच आहे की, एक वयोवृद्ध महिला सायकलवर पायांचा व्यायाम करत आहे. तिच्या पायांचे दुखणे काही केले तरी नीट होणार नाही, असे नर्सने सांगितल्यानंतरही या वयोवृद्ध दांपत्याने मात्र प्रयत्न सुरूच ठेवले आहेत. दोन मुले आणि मुलीने केवळ वेगळा संसार थाटल्याने त्यांना हा निर्णय घ्यावा लागला आहे. 72 वर्षांचा म्हातारा आजारी पडला तर त्यांची वयोवृद्ध पत्नीच त्यांची सेवा करेल, यासाठी पत्नी निरोगी राहणे गरजेचे आहे. या कथेतील सूत्रधार जेव्हा दोघांशी चर्चा करतो, तेव्हा त्याला धक्का बसतो. वयोवृद्ध दांपत्याचे एकमेकांवर जिवापाड प्रेम आहे आणि दोघे हे सारे काही एकमेकांची सेवा करण्यासाठी, विशेषत: पत्नी आपल्या पतीची एवढी सेवा करते, हे आश्चर्यकारक असल्याचा त्याचा गोड गैरसमज असतो.
उदाहरणादाखल पाहा, पत्नीची तक्रार आहे की, आयुष्यभर माझ्यावर कधीही प्रेम न केलेल्या माझ्या नवºयाला आता जाणीव झालीय की उतारवयात मीच त्याचा सर्वात मोठा आधार आहे. आयुष्यभर त्याने मला कामवाली बाईप्रमाणे वागवले. तो जेव्हा माझ्यावर हात उचलायचा तेव्हा असे वाटायचे की याचा जीवच घ्यावा. पण आता परिस्थिती बदलली आहे. आता तो म्हातारा झालाय आणि दुसरी कोणतीच महिला त्याला पसंतही करणार नाही. आता मला वाटते, या उतारवयात जितके पदरी पडते तितके चांगलेच म्हणायचे. दुसरीकडे पती म्हणतो, मी माझ्या आयुष्यात या महिलेला कधीच महत्त्व दिले नाही. हिचे हात-पाय लवकर नीट व्हावेत, यासाठी आता तिची सेवा करतोय. तिला दररोज फळे आणि मेवा खाऊ घालतो. मी आजारी पडल्यावर हीच माझी सेवा करेल. हे ऐकून कथेतील सूत्रधार अवाक् झाला. दोघांतील सौदेबाजारात कोण सरस? ही कथा वाचल्यानंतर मी याचा खूप खोलवर विचार केला. वास्तव माहीत असतानाही स्त्री-पुरुष आपले वैवाहिक जीवन जगत असतात. याला तुम्ही सामंजस्य किंवा तडजोडही म्हणू शकता. शेवटी हेच वैवाहिक जीवन आपणास नवीन दृष्टिकोन देते. ज्या नात्यात दुरावा होता, तेच नाते आता सर्वाधिक जवळचे वाटायला लागते. प्रेम आणि द्वेष नसतानाही हे नाते सर्वाधिक विश्वसनीय वाटायला लागते. सर्व कसोट्यांवर पारखलेले आणि ऊन-पावसातही साथ देणारे घट्ट नाते!
वैवाहिक जीवनाचे सार काय? आशा-आकांक्षा, तडजोड, अडचणी नेमके काय? अचानक परिस्थिती बदलते. उतारवयात आपली पत्नीच आपल्याला आधार देईल, यासाठीच पती पत्नीची सेवा करतोय. जे तारुण्यात केले नाही ते तो उतारवयात करतोय. साठ ते सत्तर वर्षांपूर्वी लिहिलेल्या या आधुनिक कथेची मुळे आजही घराघरात पसरलेली आहेत. एकमेकांची सोबत करणारे वृद्ध पती-पत्नी एकमेकांच्या आधारे जीवन व्यतीत करताना दिसून येतात. त्यांच्यापुढे अन्य पर्यायच नसतो.