आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉसविना चालणारी क्रिस्प कंपनी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एखाद्या कंपनीची प्रगती होत असल्यास कंपनीच्या वरिष्ठ नेतृत्वाला त्याचे श्रेय दिले जाते. मुख्य कार्यकारी अधिकारी, संचालक, अध्यक्ष यांच्या निर्णयानुसार कंपनी चालते. मात्र, स्वीडनमधील ‘क्रिस्प’ या सॉफ्टवेअर कंपनीत कुणीच कुणाचा बॉस नाही. कुणीही कुणाला रिपोर्ट करत नाही. कंपनीतील सर्व ४० कर्मचारी समान आहेत. कोणतेही मोठे काम करण्यापूर्वी ते बैठक घेतात आणि परस्परांमध्ये जबाबदाऱ्या वाटून घेतात.
 
‘नो सीईओ’ची संकल्पना आणि ट्रेंडमुळे क्रिस्प कंपनी सध्या आयटी जगात चर्चेत आहे. सध्याच्या स्पर्धेच्या युगात कंपन्या खूप विचार विनिमय करून मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा एखाद्या उच्च पदावरील नियुक्ती करतात. मात्र, आपल्या कंपनीत कुणाकडेही नेतृत्व द्यायचे नाही, हे क्रिस्प कंपनीतील कर्मचाऱ्यांनी पक्के ठरवले आहे. 

कंपनीत एखादे काम ठराविक व्यक्तीनेच करावे, असा नियम नाही. सर्वजण आपापली कल्पना मांडू शकतात. कंपनीच्या सर्व कामांची यादी केली जाते. तसेच कामाचे विभाजन झाल्याने ते पूर्णत्वास नेण्यासाठी वेळही कमी लागतो. कर्मचाऱ्यांच्या समाधानासंबंधीच्या एका सर्वेक्षणात या कंपनीला ५ पैकी ४.१ असे गुण मिळाले आहेत.
 
 
बातम्या आणखी आहेत...