आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संरक्षण क्षेत्रातील कंपनीची पहिली महिला सीईओ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगातील सर्वांत मोठी संरक्षण क्षेत्रातील कंपनी लॉकहिड मार्टिनच्या सीईओपदी मेरिलीन यांची नियुक्ती करण्यात आली तेव्हा एक महिला डिफेन्स कंपनी कसे सांभाळेल याचे आश्चर्य वाटले. १ जानेवारी २०१३ रोजी कुबासिक यांना कंपनीचे सीईओ केले जाणार होते. मात्र, नोव्हेंबर २०१२ मध्ये त्यांचे कंपनीतील एका कर्मचार्‍याशी घनिष्ठ संबंध होते हे उघड झाले. यामुळे कुबासिक यांच्या विश्वासार्हतेवर संशय आला आणि तातडीने ह्युसन यांना कंपनीचे सीईओ करण्यात आले. कंपनीच्या निर्णयाचा त्यांनाही धक्का बसला होता. मात्र, त्यांनी पदोन्नती घेण्यास कधीही नकार दिला नाही. त्या ३२ वर्षांपासून या कंपनीत असून आतापर्यंत आठ वेळेस त्यांची पदोन्नती झाली आहे.

याव्यतिरिक्त त्यांनी कंपनीच्या २९ प्रोजेक्ट्समध्ये नेतृत्व केले आहे. मात्र, ह्युसन यांनी कंपनी संभाळल्यानंतर १८ महिन्यांत निकाल देण्यास सुरुवात केली. खर्च कमी करून कंपनीला बळकट केले आणि कंपनीचे भांडवल वेगात वाढले. सीईओ, चेअरमन आणि प्रेसिडेंट होताच कंपनीसाठी अमेरिकी काँग्रेसची (संसद) भेट घेणे हा त्यांचा मुख्य उद्देश होता. याशिवाय पेंटागॉनमध्ये (अमेरिकी संरक्षण मंत्रालय) ग्राहकांची मागणी समजून घेणे आणि त्यांची अंमलबजावणी करणे हे काम होते. याबरोबर कंपनीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदारांना तयार करण्याचीही जबाबदारी होती.

एफ- ३५ फायटर जेटच्या त्या समर्थक आहेत. यामुळे भविष्यात २५ हजार लोकांना काम मिळू शकेल,असे त्यांचे म्हणणे आहे. अमेरिकेला सर्वात जास्त शस्त्रपुरवठा त्यांच्याच कंपनीकडून केला जातो. त्यांची ९६ वर्षीय आई दुसर्‍या महायुद्धात महिला लष्करी तुकडीत परिचारिका होती. ह्युसन नऊ वर्षांची होती तेव्हा वडिलांचे निधन झाले. ते पण लष्करातच होते. आई कन्सासच्या जंक्शन सिटीची रहिवासी होती, मात्र वडिलांच्या निधनानंतर आईने लष्कराकडून मिळालेल्या पैशातून अलबामामध्ये घर खरेदी केले.

शाळेत नाव घालताना आईने मेरिलीन नावात आणखी एक एल जोडले. शिक्षिका हजेरी घेईल तेव्हा एल अक्षरामुळे ती थोडा वेळ थांबेल व मुलीकडे लक्ष देईल, अशी आईची धारणा होती आणि तसेच होत होते. आईने एका शाळेच्या कँटीनमध्ये काम करून पाच मुलांना शिकवले. चार भाऊ-बहिणी अपार्टमेंट्सची स्वच्छता करत. मोठा भाऊ व्हिएतनाम युद्धासाठी गेला होता.
- मेरिलीन ह्युसन, सीईओ
- जन्म- १९५४
- आई- मेरी अ‍ॅडम्स (लष्करात नर्स होती), वडील - माजी सैनिक, चार भाऊ-बहिणी
- शिक्षण- युनिव्हर्सिटी ऑफ अलबामामधून बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशनमध्ये पदवी आणि मास्टर ऑफ इकॉनॉमिक्स.
- कुटुंब- पती जेम्स, दोन मुले
चर्चेत- वॉल स्ट्रीट जर्नलने नुकतेच जगातील सर्वाधिक वेतन मिळवणारी महिला सीईओ जाहीर केले आहे.
बातम्या आणखी आहेत...