आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इतरांचे प्राण वाचवणे हेच आमुचे कर्तव्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पृथ्वीतलावर जन्म घेणे ही नैसर्गिक बाब आहे, परंतु जन्मलेल्यांचे प्राण वाचवणे म्हणजे जबाबदारी आणि मानवता होय. हार्वर्डमधून शिकलेली कविता असो की आठवी पास कृष्णा, दोघींनी कर्तव्यालाच यश मानले. एकीने लाखो लोकांना कुष्ठरोगापासून वाचवले, तर दुसरीने अनाहूत बालकांत जगण्याची जिज्ञासा निर्माण केली. अनुराधा तर काहीच शिकली नाही. परंतु प्राण्यांची भाषा जाणते. आणखी एक महिला जी व्यवसायाने डॉक्टर आहे आणि सियाचीनमध्ये सैनिकांचे प्राण वाचवत आहे. या सर्व जणींच्या या गौरवास्पद गाथा...

अनुराधा, पाणी आणि पर्यावरण

तिच्या एका सादेने हरणे धावत येतात
पोर्टब्लेअर ।त्यांचा आवाज ऐकू न हरिण, ससे पळतच येतात. रॉस बेटावर पाय ठेवताच मोर पिसारा फुलवून नाचत सुटतात, खारूताई त्यांच्या अंगाखांद्यावर खेळते, चिमण्या चिवचिवाट करायला लागतात. येथे राहणारे 400 हरणे, 245 मोर, 1000 पेक्षा जास्त खारूताई, शेकडो पोपट आणि सशांची त्या आई, मित्र आणि डॉक्टरही आहेत. अनुराधा असे त्यांचे नाव. मागील 20 वर्षांपासून त्या अंदमान-निकोबारस्थित रॉस बेटावर बोटीने अर्धा तासाचा प्रवास करून नित्यनेमाने येतात. आपल्या बॅगेत त्या पोर्टब्लेअरमधूनच स्वादिष्ट खाद्यान्न घेऊन जातात. हे पदार्थ फस्त करण्यासाठी हरणे त्यांच्या आजूबाजूला फिरत राहतात. रॉस बेटावरील प्रत्येक इमारत, प्रत्येक झाड अनुराधा यांच्या ओळखीचे आहे. या भागाचा इतिहास आणि भूगोल त्यांना इत्थंभूत ज्ञात आहे. अर्थातच त्या या भागातील चालताबोलता ‘एन्सायक्लोपीडिया’ आहेत. त्या दररोज सकाळी पहिल्या प्रवासी बोटीने येथे येतात आणि सर्वात शेवटच्या बोटीने परततात. पोर्टब्लेअरहून रॉस बेटावर जाण्यासाठी दर तासाला बोट जाते. जेव्हा प्रवासी बोटी बंद होतात तेव्हा त्या मासेमारांना विनंती करून त्यांच्या बोटीत बसून घरी येतात. अनुराधा सांगतात की, ‘जेव्हा सुनामी आली होती तेव्हा 20 दिवस या भागात येऊ शकले नाही. त्या काळात अन्नपाणी गोड लागले नाही. वारंवार किना-यावर लागलेल्या बोटींकडे पाहून दु:खी मनाने घरी परत यायचे.’
अनुराधा सहा वर्षांच्या होत्या तेव्हा पहिल्यांदा रॉस बेटावर आल्या होत्या. येथील उपाशी प्राणी पाहून त्यांना राहवले नाही आणि दुस-या दिवशी घरून भाकरी घेऊन येथे आल्या. त्यानंतर हे रोजचेच झाले. घरातून प्रचंड विरोध झाला, परंतु त्यांनी कोणाचेच ऐकले नाही. सुनामीत परिवारातील चार माणसे गमावली. त्यानंतर एका कार दुर्घटनेत पती आणि मुलाचा मृत्यू झाला. त्या सांगतात की, जेव्हा केव्हा मी दु:खी झाले तेव्हा येथील प्राण्यांनी सहारा दिला. त्याचप्रमाणे प्राण्यांना जेव्हा केव्हा काही गरज भासते त्या वेळी त्या काहीही करून त्यांची मदत करतात. आजारी प्राण्यांना कित्येकदा त्या आपल्या घरी घेऊन येतात आणि त्यांच्यासाठी स्वत: औषधी तयार करतात. त्यानेही ते बरे झाले नाही तर मग डॉक्टरांची मदत घेतात. 6 वर्षांची अनुराधा ज्याप्रमाणे हे प्राणी बघून आनंदित झाली होती, त्याचप्रमाणे आजही वयाच्या 50 व्या वर्षी त्या तशाच आहेत. त्यांनी प्राण्यांची नावेही ठेवली आहेत. त्या सर्वात जास्त लक्ष ‘बुढ्ढे बाबा’ नावाच्या हरणाकडे देतात. हे हरिण बेटावरील सर्वात वयोवृद्ध हरिण असून त्याचे वय 11 वर्षे 6 महिने इतके आहे. त्याच्या तोंडात एकही दात नाही आणि एखाद्या म्हाता-याप्रमाणेच ते पदार्थ खाते.


अनुराधा यांच्या पणजोबांना कैद्याच्या रूपात तुरुंगात आणण्यात आले होते. 1945 मध्ये जपानी सैनिकांनी त्यांची हत्या केली. 1947 मध्ये वादामुळे सरकारने बेट खाली करवून घेतले. त्यामुळे अनुराधा यांनाही कुटुंबीयांसोबत पोर्टब्लेअरला यावे लागले. 1979 पासून त्या रॉस आर्यलँड नेव्हीजवळ राहतात. त्यांना जेव्हा गरज भासते तेव्हा
नौदलाचे सैनिक त्यांची मदत करतात, असे अनुराधा सांगतात.


प्रथमच सियाचीनवर तैनात
सैन्यातील दोन महिला डॉक्टर

लेह । समुद्रसपाटीपासून 21 हजार फूट उंचीवरील सियाचीन हिमशिखर. ऑक्सिजनचे प्रमाण 30 टक्के कमी. सामान्यांना श्वास घेणेही कठीण. जानेवारीत तापमान उणे 60 डिग्रीच्या आसपास. ऊब मिळवण्यासाठी पाच-पाच पदरी पांघरूण घेतल्यानंतरही हुडहुडी कमी होत नाही. हवामानाच्या या उग्र रूपावरही आणखी एक आव्हान म्हणजे भारत आणि पाकिस्तानदरम्यान नेहमीच होणारा गोळीबार.
अशा प्रतिकूल परिस्थितीत 1999 मध्ये प्रथमच या परिस्थितीत दोन महिला वैद्यकीय अधिका-यांची नियुक्ती झाली. कॅप्टन (डॉ.) अर्चना अपूर्वा आणि त्यांची सहकारी कॅप्टन (डॉ.) रमा गुप्ता. लष्कराच्या सर्वात आव्हानात्मक ठिकाणी. त्या वेळी डॉ.अपूर्वा या 24 वर्षांच्या होत्या आणि अविवाहित. रमा यांच्या लग्नाला दोन वर्षे झाली होती, पण दोघे पती-पत्नी दोन महिनेही सोबत राहू शकले नव्हते. त्यांची सियाचीनमध्ये बदली झाल्यावर पती डेहराडूनमध्ये होते.
कॅप्टन अर्चना आणि कॅप्टन रमा यांनी इतिहास रचला. लडाखमधील सियाचीन हिमशिखरावर अणि तुरतुक सबसेक्टरमध्ये तैनात झालेल्या त्या पहिल्या महिला डॉक्टर आहेत. पाकिस्तानी सैनिकांशी लढणा-या भारतीय जवानांना वैद्यकीय उपचार करणा-या या दोन डॉक्टर दिसायला अगदी सामान्य शरीरयष्टीच्या आहेत. मात्र, 12000 फूट उंचीवर उणे 20 डिग्री तापमानात, बर्फाळ हवेचे झोत झेलत जवानांची प्राणपणाने सेवा करणा-या या महिलांची प्रतिमा वास्तवाहून उच्च प्रतीची भासते. डॉ. अपूर्वा आणि डॉ. गुप्ता येथे दोन वर्षे तैनात होत्या. मात्र, दोघीही एकाच रुग्णालयात नव्हत्या. एक प्रतापूरजवळीच हुंडर येथे होत्या, तर दुस-या तुरतुकमध्ये. दोघींमधील अंतर 80 किलोमीटरचे.
डॉ. अपूर्वा सांगतात, ‘त्यादरम्यान लष्कराने ऑपरेशन सद्भावना सुरू केले होते. त्याअंतर्गत गावातील लोकांवर उपचार करायचे होते. ही गावे सलग रस्त्यावर नव्हती. बर्फाच्छदित डोंगरांवर तासन्तास चढून जावे लागत होते. मी आणि रमा दोघीही गावागावांत जाऊन तेथील रुग्णांवर उपचार करत होतो. प्रत्येक महिन्यात एक कँप लावला जात होता.’ रमा सांगतात, ‘लडाखमध्ये महिला स्वत:च्या प्रसूतीसाठी अनेक तास बर्फाळ शिखरे पार करून रुग्णालयात जात असत. मात्र, आम्ही तुरतुकला पोहोचल्यावर या महिलांच्या गावातील घरी जाऊन प्रसूती केली.’
1999 मध्ये ‘ऑपरेशन विजय’मध्येही रमा आणि अपूर्वाने ध्येयाची वाट सोडली नाही. अनेक आठवडे सतत 24 तास ड्यूटी केली. जखमी सैनिकांच्या शरीरातून गोळ्या काढत असत. त्यांच्या जखमांवर उपचार करत असत. अनेकदा बर्फ आणि ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे पीडित रुग्ण त्यांच्याकडे येत असत. एकदा त्या अंडरग्राउंड बंकरमध्ये जखमी सैनिकावर ऑपरेशन करत असताना बंकरवर ग्रेनेड पडले. जनरेटर बंद पडले. पण त्यांनी ऑपरेशन सुरूच ठेवले. डॉ. गुप्ता सांगतात, ‘आम्ही दिवसभर तुरतुकमधील सैनिक आणि नागरिकांवर उपचार करत होतो. महिनाभरातून दोघी फक्त एकदा भेटत होतो. तेसुद्धा त्या दिवशी आमची ड्यूटी एक्स्चेंज होत असे.
त्या कठीण परिस्थितीत स्वत:मधील उत्साह टिकवून ठेवण्यासाठी पुस्तके वाचत असत. दोन वर्षांत एक पुस्तक अनेकदा वाचून काढले. अनेक महिन्यांपूर्वीची वर्तमानपत्रे आणि मासिके पुन्हा पुन्हा वाचली.

दुर्दैवी मुलांसाठी लढा :
आईच्या वेदनेने दिले जगण्याचे ध्येय
कोलकाता । कृष्णा आईच्या गर्भात होती, तेव्हा दरोडेखोरांनी तिच्या वडिलांची हत्या केली. पोट भरण्यासाठी तिची आई आपल्या चार वर्षांच्या मुलासोबत सुंदरबनहून कोलकात्याला आली. नशिबाने त्यांना वेश्या व्यवसायात ढकलले. आज त्याच आईची मुलगी कृष्णा अनेक बालिका आणि त्यांच्या मातांना या क्षेत्रातून बाहेर काढण्याचे काम करत आहे.
कृष्णा सांगते की, ‘माझी आई विवश होती त्यामुळे ती या व्यवसायात आली. त्या वेळी अनेक पुरुष आमच्या घरी यायचे. आईच्या आर्थिक परिस्थितीमुळे मी आठवीनंतर शिकू शकले नाही. अनेक दिवस बेघर म्हणून काढले. अशा स्थितीत शेजा-यांच्या छतावर झोपायचो आणि पाऊस आला की जिन्यावर पडायचो. अनोळखी माणसे रात्री छतावरही येऊन आईमागे लागायची. अनेकदा ते पुरुष मलाही पायाने स्पर्श करण्याचा प्रयत्न करायची.’ सध्या 32 वर्षांची असलेली कृष्णा रेड लाइट एरियात बालक आणि महिलांसाठी रात्रनिवारा चालवते. सुरुवात 13 वर्षांपूर्वी 10 मुलांसह करण्यात आली होती. महिला आपली मुले सोडून परपुरुषांसोबत असायच्या, तेव्हा कृष्णा त्या मुलांना आपल्याजवळ घेऊन यायची. नंतर कृष्णाचे घर महिला व बालकांसाठी सुरक्षित आसरा बनले.