आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

WOMEN\'S DAY SPL: अर्थ साक्षरता आणि महिलांची गुंतवणूक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आजची महिला केवळ 'चूल आणि मूल'या चौकटीपुरती मर्यादित राहिलेली नाही. तिने कॉर्पोरेट क्षेत्रात स्वबळावर स्वत:चे कर्तृत्व सिद्ध केले आहे. एवढेच नाही तर कुटूंबाची अर्धी जबाबदारी यशस्वीपणे पार पाडण्यासाठी महिलांमध्ये आर्थिक नियोजनाचे कौशल्य असल्याचे नाकारून चालणार नाही. अगदी ग्रामीण भागातील महिलाही यात मागे नसते. प्रतिकूल परिस्थितीतही ही महिला महिनाभराचे घरखर्चाचे नियोजन व्यवस्थित करते. पुरुषांसह महिलांनाही बचतचे महत्त्व कळले आहे. केंद्र सरकार तसेच राज्य सरकारने पुरुषांसह महिलांसाठी अनेक गुंतवणुकीच्या योजना आणल्या आहेत. परंतु तरीदेखील बहुतेक महिलांना पैसे गुंतवायचे कुठे? हे कळत नाही. कारण त्यांच्यापर्यंत त्या स्वत: पोहोचत नाहीत.
महिलांनी विविध क्षेत्रात प्रगती साधली असली तरी बहुतांश महिला 'अर्थ साक्षर'नसल्याचे दिसून येते. महिलांना बचतचे मह‍त्त्व आहे. परंतु बचत केलाला पैशांत वृद्धी करण्‍यासाठी काय उपायोजना केल्या पाहिजेत हे त्यांना माहीत नसते. यामुळेच 'अर्थ साक्षरता'ही काळाची गरज होऊन बसली आहे. गुंतवणूक म्हणजे काय? गुंतवणुकीचे प्रकार किती? गुंतवणूक का करावी? गुंतवणूक कोणी करावी? गुंतवणूक कुठे करावी? गुंतवलेल्या पैशांची वाढ कशी होणार? असे प्रश्न बहुतेक कुटूंबातील महिलांना पडत नाहीत. कारण त्यांचा कुटूंबाच्या आर्थिक व्यवस्थापनात सक्रिय सहभाग नसतो. कुटुंबाच्या आर्थिक व्यवस्थापनात महिलांनी सक्रिय सहभाग घेणे आवश्यक आहे. केवळ कुटुंबाच्याच नव्हे, तर स्वावलंबनासाठी हे आवश्यक आहे.
बचत आणि गुंतवणूक हा खरं तर महिलांचा प्रांत नसल्याची टीका काही जण करतात. कारण पैशाची गुंतवणूक करण्यातील महिलांच्या क्षमतेवर काहींचा विश्वास नसतो. विशेष म्हणजे जोखिम स्विकारण्‍याची त्यांच्यात हिंमत नसते. आर्थिक व्यवहारांबद्दल महिलांना कमी माहिती असते.
आपल्या देशातील पुरुषप्रधान संस्कृती आता इतिहास जमा होऊ पाहात आहे. कुटुंबाचा मुख्य सदस्य पती किंवा मुलगा असला तरी तेवढेच महत्त्व आता एका स्त्रीलाही प्राप्त झाले आहे. कोणतेही काम असो किंवा जबाबदारी पेलण्याचा विषय असो, स्त्रिया पुरुषांसोबत स्पर्धा करू शकतात.
पुढील स्लाइडवर वाचा, गुंतवणुकीचे पर्याय...