आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅनेजमेंट फंडा : कर्म असे विज्ञान आहे ज्याची व्याख्या होत नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आम्ही शालेय मित्रांनी गेल्या गुरुवारी एका रोड ट्रिपचे आयोजन केले हाेते. मुंबईपासून ११० किलोमीटर अंतरावरील एका छोट्याशा ढाब्यावर आम्ही पहिला थांबा घेतला. नाष्टा आणि चहा घेतल्यावर आम्ही तेथून निघालो. अंधार पडायच्या आत आम्हाला हॉटेलला पोहोचायचे असल्याने त्या ढाब्यावर जास्त वेळ थांबण्याची इच्छा आम्ही दाबली. त्या ढाब्यापासून ४० किलोमीटर पुढे गेल्यावर एका मित्राच्या लक्षात आले की, त्याचे पैशाचे पाकीट त्या ढाब्यावरच विसरले आहे. आम्ही परत माघारी फिरलो. त्या ढाब्यावर आल्यावर गल्ल्यावर एक महिला बसलेली दिसली. आम्ही तिला सगळी कहाणी सांगितली. तिने वेटरला हाक मारून आमचे पाकीट सापडून देण्याचा आदेश त्याला दिला. सगळीकडे शोधाशोध करूनही पाकीट सापडले नाही. ती महिला हॉटेलमालकाची बायको होती. ती म्हणाली, ‘साहेब तुमचा फोन नंबर देऊन जा, पाकीट सापडल्यास आम्ही फोन करू.’ तिचा नवरा आजारी मुलाला घेऊन शहरातील मोठ्या दवाखान्यात गेल्याचे तिच्या बोलण्यावरून समजले. तिच्या या बोलण्याने मला अचानक ‘द बेनिफेक्शन’ या चित्रपटाची आठवण झाली. कर्मावर आधारित असलेल्या त्या चित्रपटाची सगळी कथा माझ्या डोळ्यासमोर तरळली आणि जर माझ्या मित्राचे पाकीट या ढाब्यावर हरवले असेल तर ते नक्की सापडेल असा विश्वास वाटला. 

या चित्रपटाची कथा निखैट पाॅवेलने लिहिली होती. त्यानेच या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मिती केली हाेती. या चित्रपटाची कथा ऋषी नावाच्या एका टॅक्सी ड्रायव्हरच्या आसपास घुमते. त्या टॅक्सी ड्रायव्हरचे अापल्या परिवारावर खूप प्रेम असते. आपली पत्नी आणि सात वर्षांच्या मुलीवर त्याचे खूप प्रेम असते. एक दिवस त्याची मुलगी अचानक आजारी पडते. त्यापेक्षा मोठे दु:ख म्हणजे त्याची टॅक्सीही त्याच्या हातून जाण्याची वेळ येते. एक दिवस त्याला त्याच्या टॅक्सीत पैशाची बॅग आणि काही महत्त्वाची कागदपत्रे सापडतात. आपली गरज आणि नैतिक मूल्ये यापैकी त्याला काहीतरी एक निवडायचे असते. चित्रपटात हा प्रसंग खूप सुंदर चित्रित केला आहे. बाप आणि मुलगी यांच्या नात्यावर प्रकाश टाकणारा हा चित्रपट होता. चित्रपटात त्या टॅक्सी ड्रायव्हरची पत्नी नीना वास्तव हिची भूमिकाही महत्त्वपूर्ण आहे. ती जास्त शिकलेली नाही, मात्र तिच्यात एक आग आहे. कुठलाही सहारा नसताना आणि पैशाची सोय नसतानाही आपल्या निर्णयावर ठाम राहणारी नीना खूप छान वाटते. ‘दे बेनिफेक्शन’ची कथा अनेक वळणे घेते. एकीकडे गरजेसाठी काहीही करण्याची तयारी तर दुसरीकडे आपल्या सिद्धांतावर अडून राहण्याची वृत्ती अशी सगळीच सरमिसळी दिग्दर्शकाने छान रंगवली होती. काहीही झाले तरी आपल्या कर्मानुसार आपल्याला फळ मिळते हे त्या कथेत दिसले. 

आम्ही त्याच ढाब्यावर होतो. मित्राचे पाकीट सापडल्याने त्याने पाकिटातील सगळे क्रेडिट कार्ड ब्लॉक करण्याचा सपाटा लावला. दुसऱ्या एका मित्राने हॉटेल मालकाचा नंबर घेऊन त्याला फाेन केला. कल्याणमधील एका डॉक्टर मित्राचा नंबर देऊन त्याच्याकडे मुलाला घेऊन जाण्याचे सुचवले. योगायोगाने तो हॉटेल मालक कल्याणलाच गेला होता. हॉटेल मालकाच्या पत्नीला तुमचा मुलगा ठिक होईल असे आश्वासन देऊन आम्ही त्या ढाब्यावरून निघालो. दुसऱ्या दिवशी माझ्या मित्राचे पाकीट त्याच ढाब्यावर सापडल्याचे त्यानेच मला फोन करून कळवले. 

फंडा असा आहे की... 
कर्म असे विज्ञान आहे, ज्याची व्याख्या केली जाऊ शकत नाही. मात्र कर्माला जो मानतो ताे नक्कीच फायद्यात राहतो, यावर माझा विश्वास आहे. 

- एन. रघुरामन, मॅनेजमेंटगुरू 
raghu@dbcorp.in
बातम्या आणखी आहेत...