आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • World Homeopathy Day News In Marathi, Samuel Hahnemann, Nashik, Divya Marathi

आज आहे world homeopathy day, वाचा होमिओपॅथीचे जनक डॉ सॅम्युअल हानेमन विषयी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डॉ. सॅम्युअल हानेमन यांना होमियोपॅथी उपचार पद्धतीचे जनक मानले जाते. त्यांचा जन्म 10 एप्रिल 1755 या दिवशी झाला. म्हणूनच 10 एप्रिल हा दिवस जागतिक होमिओपॅथी दिन म्हणून पाळला जातो.
होमिओपॅथी उपचार पद्धतीचे जनक डॉ. सॅम्युअल हानेमन यांनी अतिशय गरिबीच्या परिस्थितीत वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. शिकत असताना अर्थार्जनासाठी त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी रोजगारासाठी प्रयत्न करावे लागले. 1790 मध्ये एकदा ‘कुलेन्स मटेरिया मेडिका’ या पुस्तकाच्या अनुवादाचे काम त्यांच्याकडे आले. त्यात विविध वनस्पतींच्या औषधी गुणधर्माविषयी माहिती होती. डॉ. हानेमान यांना त्या माहितीचे कुतूहल निर्माण झाले. पेरुवियन बार्क या झाडाची साल मलेरियावर गुणकारी असते, या माहितीसह या सालीपासून औषध तयार करण्याची माहितीही त्यात होती. त्या माहितीनुसार औषध तयार करून स्वत: ते औषध घेतले. त्यामुळे त्यांना त्रास जाणवू लागला व ते आजारी पडले.
डॉ. हानेमन यांच्या लक्षात आले की, त्यांच्या आजाराची लक्षणे आणि मलेरियाची लक्षणे यात बरेच साम्य होते. औषध घेणे बंद केल्यावर हळूहळू ती लक्षणेसुद्धा कमी होत गेली. त्यानंतर डॉ. हानेमन यांनी अशाच पद्धतीने बरीच औषधे स्वत:वर आणि इतरांवर प्रयोग करून होणारा परिणाम अभ्यासला आणि निष्कर्ष काढला की, निरोगी माणसात आजाराप्रमाणे लक्षणे निर्माण करणारी औषधे रुग्णाला दिल्यास ती औषधे आजार बरा करू शकतात. त्यानंतर सहा वर्षांच्या संशोधनानंतर डॉ. हानेमन यांनी 1796 मध्ये ‘होमिओपॅथी चिकित्सा पद्धती आणि त्यांचे तत्त्वज्ञान’ जगासमोर मांडले.
पुढे वाचा काय आहे होमिओपॅथीचे तत्त्वज्ञान.......