आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुरकुत्यांवरील खळी ...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एका डिव्हायडर नसलेल्या मोठ्या रस्त्यावर मी चालत होतो. समोरून पांढरा शुभ्र कुर्ता पायजमा घातलेले एक आजोबा, एका खांद्यावर शबनम, एका हातात काठी, डोळ्यावर मोठ्या भिंगाचा मोठी फ्रेम असलेला चष्मा, येत होते. आम्ही अमोर-समोर आलो .. जरी आमची ओळख नव्हती .. तरी त्यांनी माझ्याकडे बघून ‘स्माइल’ केले. आम्ही एकमेकांना क्रॉस केले. मी पुढे निघून गेलो .. पुढे गेल्यावर मी मागे वळून पाहिलं. ते आजोबा रस्ता क्रॉस करण्याचा प्रयत्न करत होते. रस्त्यावरून ब-याच गाड्या ये -जा करत होत्या. मी मागे आलो. खांद्यावर हात ठेवला आणि त्यांना रस्ता क्रॉस करून दिला. ते धन्यवाद म्हणाले ..आणि मी परत माझ्या मार्गी लागलो. चालता चालता मनात आलं...मी मागे वळून का बघितलं ? मी आजोबांना मदत का केली? थोडा विचार केल्यावर मला उत्तर मिळाले. उत्तर दडलं होत त्या आजोबांच्या सुरकुत्या असलेल्या गालावरील खळीमध्ये. मी त्यांना फुकट मदत केली नव्हती. जसं आजकाल घडतं... कुणी कुणाच्या मदतीला फुकट येत नाही. त्यांनी मला मदत केली, म्हणून मी त्यांना मदत केली. सगळं घडलं पण नकळत. मी चालत असताना टेन्शनमध्ये होतो आणि जेव्हा त्यांनी मला स्माइल दिलं .. माझं टेन्शन थोडं कमी झालं. म्हणजेच त्यांनी मला मदतच केली. म्हणूनच मी मागे वळून बघितलं आणि मी त्यांना रस्ता क्रॉस करून दिला. आपण कळत- नकळत जरी चांगले वागलो तरी त्यामागे कारण असतंच असं वाटून गेलं. परमेश्वरांने लोककल्याण करण्यासाठी बुद्धी दिलेली आहे. तिचा वापर योग्य कारणासाठी व्हावा. हस्तेपरस्ते मदत करण्याने कोणाचे तरी भले होते यात आपण समाधान मानले पाहिजे. रस्त्यावर चालत असताना एक लहान मुलगा आपल्यापुढे हात पसरतो. आपलाही हात नकळतपणे खिशाकडे जातो. का...? तर आपणास त्या मुलांच्या चेह-यात आपला मुलगा दिसतो. ही भ्रातृभाव कल्पना जागृत ठेवण्याचीच गरज आहे.