आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनोख्या आनंदाचे तंत्रज्ञान व्हर्च्युअल रिअॅलिटीने जग बदलू शकते

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पामेर लकी सिलिकॉन व्हॅलीच्या इतर शिकाऊ लोकांपेक्षा वेगळे आहेत. ते वेगळ्याच जगातील विद्वान आहेत. जो एका वेगळ्या जगाच्या समस्यांवर काम करीत आहे.
तो व्हिडिओ गेम आणि सायन्स फिक्शनच्या जगाचा खेळाडू आहे. यामुळेच आपल्यासमोर यावर्षी काल्पनिक वास्तविकता म्हणजेच व्हर्च्युअल रिअॅलिटीचे जग समोर आले आहे. २२ वर्षांच्या लकीने गेल्या वर्षी स्वत:ची कंपनी ओकुलस व्हीआर फेसबुकला १४७ अब्ज रुपयांमध्ये विकली. कंपनीमध्ये ३५० कर्मचारी आहेत. तिचे कार्यालय अमेरिकेतील सिलीकॉन व्हॅलीव्यतिरिक्त सिएटल, डलास, आस्टिनआणि दक्षिण कोरिया, जपानमध्येही आहेत. मार्क जकरबर्ग आणि टेक इंडस्ट्रीला लकीच्या सेन्सरी गॉगल्स आणि वायरी ठेवण्यासाठी ‘पिली बाल्टी’कडून खूप अपेक्षाआहेत. या लोकांनी इंटरनेटला मोबाइलद्वारे प्रभावित होताना पाहिले आहे. त्यांना सूचना मिळवण्याच्या पुढील प्लॅटफॉर्मच्या क्षमतेची जाण आहे.

लकीचे म्हणणे आहे की, व्हर्च्युुअल रिअॅलिटी (व्हीआर) निर्णायक प्लॅटफॉर्म आहे. व्हर्च्युअल रिअॅलिटीच्या पहिल्या मशिनरी ख्रिसमसपर्यंत बाजारात येणार नाही. मात्र, मोठ्या संख्येत लोक यावर पैसे लावत आहेत. नवीन काम सुरू करण्यासाठी नोकरीही सोडली आहे.
व्हर्च्युअल रिअॅलिटीवर अनेक वर्षांपासून चर्चा होत आहे. मात्र, यापूर्वी या तंत्रज्ञानात एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसे आणि ज्ञान आले नव्हते. हँडसेटची विक्री या वर्षापासून सुरू होईल. २०१६ मध्ये प्रतिस्पर्धा नाटकी पद्धतीने वाढेल. पहिले समर्पित गेमर आणि गिझेटमध्ये असलेले लोक याची खरेदी करतील. ते महागडेदेखील असतील. पूर्ण सेटची किंमत जवळपास ९५ हजार रुपये असेल. पूर्वी ज्याप्रकारे अनावश्यक तंत्रज्ञान म्हणून मोबाइलची खिल्ली उडवायचे, तसेच या वेळीही होईल अशी शक्यता आहे.

एप्रिलमध्ये सॅनफ्रान्सिस्कोच्या स्टेडियममध्ये व्हेंंचर कॅपिटलिस्ट माइक रोथेनबर्गने ३६० पाहुण्यांना त्या २० व्हर्च्युुअल रिअॅलिटी कंपन्यांची माहिती देण्यासाठी निमंत्रित केले होते. ज्यात त्यांची फर्म रोथेनबर्ग वेंचर्सने पैसे लावले आहेत. प्रत्येक व्हीआरची माहिती देण्यासाठी मी विचित्र वाटणारे गॉगल वापरले. अधिकतर गॉगल्सच्या काचांसमोर स्मार्टफोन फिट केला होता. पूर्ण काम हेच होते. या मशीनची स्क्रीन तुमच्या पाहण्याच्या क्षमतेला दृश्यांनी भरून देते.
दृश्यांमधील वास्तविकता थ्री-डीपेक्षा अधिक स्पष्ट होती. मी चारही बाजूंनी पाहू शकत होतो. वर, खाली आणि मागे पाहण्यासाठी डोके हलवावे लागत होते. तुम्हाला हे लक्षात येते की तुम्ही भ्रामक
वातावरणात आहात. त्यामुळेच हे आश्चर्यकारक तंत्रज्ञानाचा शोध आहे. तरीसुद्धा हे असे नाही की मी टीव्ही सोडून हे पाहिले.

मार्चमध्ये व्हीआर लॉस अँजल्स एक्स्पोमध्ये ५०पेक्षा जास्त कंपन्या सहभागी झाल्या होत्या. तेथे बूथमध्ये प्रवेश घेण्यासाठी एका कॉन्ट्रॅक्टवर सही करावी लागते. त्यात सांगण्यात आले, व्हर्च्युअल रिअॅलिटीचा अनुभव करताना काही लोकांना मळमळणे, लक्ष विचलित होणे, अस्वस्थता आणि स्वास्थ्याच्या इतर समस्या उद‌्भवतात. स्क्रीन रिफ्रेश करण्याची गती वाढवून हे कोडे सोडविण्यात आले. ओकुलसच्या शेवटच्या व्हर्जनमध्ये गरगरणे व दृश्य परिवर्तनामध्ये फक्त २० मिली सेकंदा अंतर आहे.

व्हर्च्युअल रिअॅलिटीसोबत काही समस्या आहेत. ओकुलस आणि व्हाल्वला लवकरच लक्षात आले की, येथे व्हिडिओ गेमची कथा मांडणीचे नियम काम करत नाहीत. स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीची व्हर्च्युअल ह्यूमन इंटरअॅक्शन लॅबमध्ये २००३ पासून या समस्यांबाबत विचार करणारे जेरेमी बेलेन्सन मानतात, वीआर कुठल्याही अनुभवापेक्षा जास्त नाही.

अवतार, टायटॅनिक आणि टर्मिनेटर चित्रपटांचे दिग्दर्शक जेम्स केमरनचे म्हणणे आहे की, वीआर त्यांच्यासाठी उपयोगी नाही. तरिसुध्दा मोठ्या प्रमाणावर, वीआर प्रोडक्ट बनवणारे आणि विकणारी पहिली कंपनी वीपीएल रिसर्चचे संस्थापक जेरोन लेनियर म्हणतात, जसे बोलणे जसे मौखिक संवादाचे माध्य आहे. ठीक त्याप्रमाणे वीआर व्हिज्युअल अभिव्यक्तीचे स्वाभाविक माध्यम आहे. हे लिखित भाषेसह प्रिंटींग प्रेस, नंतर फोटोग्राफीने ऑडिओ रेकॉर्डिंग आणि चित्रपटाच्या नंतरचा भाग आहे. हे तुमच्या आणि इतर जगाच्यामधील अंतर धुसर करतात. शक्यता आहे, व्हर्च्युअल रिअॅलिटी अभिव्यक्तिचा नवी प्रकार आहे. हे एक छोटा आनंद देणारा अनुभव होऊ शकतो. हे सुध्दा की थिएटर, पेंटिंग, प्रिंट, म्यूझिक आणि चित्रपटासोबत मनोरंजनाचे एक अन्य माध्यम आहे.
गॉगल्सपासून व्हिडिओ आणि थ्री-डी गेमचा नजारा
>मायक्रोसॉफ्टची होलोलेन्स डोक्यावर लावण्यात आलेल्या पारदर्शक वायजरद्वारे होलोग्राफिक इमेज दाखवते. यूजर वेब पेज उलटण्यासाठी, व्हिडिओची स्थिती ठीक
करण्यासाठी व टेबल टॉप व्हिडिअो गेम खेळण्यासाठी डिजिटल इंटरफेसला कंट्रोल
करू शकतो.
>गेमिंग फर्म व्हाॅल्व व तैवानची फोन कंपनी एचटीसीने बनवलेले डिव्हाइस - द वाइव्ह इन्फ्रारेड सेन्सर आणि कंट्रोलरांमार्फत वापरणाऱ्यांना व्हर्च्युअल जगात फिरण्यासाठी आणि किचनमध्ये कामाला येणाऱ्या वस्तू, अवजारांना चालवण्याची सुविधा देतात.
> डिझायनर अजूनही शोध घेत आहेत की, कुठल्या प्रकारचे थ्री-डी गेमव्हर्च्युअल रिअॅलिटीमध्ये चांगल्या प्रकारे सादर करता येतील. ओकुलस रिफ्टसाठी निर्मित Lucky’s Tale निनटेंडो डिव्हाइससाठी बनवलेले Mario games सारखे अॅक्शन अॅडव्हेंचर आहे.
पुढील स्लाइडवर वाचा, संबंधित माहिती...