आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमेरिकेतून आईला फोनवर रेसिपी विचारायच्या राखी कपूर-टंडन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पती अल्केशसह राखी कपूर-टंडन - Divya Marathi
पती अल्केशसह राखी कपूर-टंडन
> चर्चेत- आयपीएलअंतिम सामन्याच्या पुरस्कार सोहळ्यातील सहभागानंतर सोशल मीडियात चर्चेत आल्या.
> जन्म- जुलै 1986
> पती- अल्केशसह राखी कपूर-टंडन.
> वडील- राणा कपूर (येस बँकचे प्रमुख), आई-बिंदू कपूर, मोठी बहीण राधा, लहान रोशनी
> शिक्षण- व्हार्टनस्कूल ऑफ युनिव्हर्सिटी पेनसिल्व्हेनियामधून पदवी.

राणा कपूर यांनी आपल्या सर्व मुलींची नावे 'आर' शब्दापासून ठेवली आहेत. मुंबईमध्ये प्राथमिक शिक्षणानंतर राखीने व्हार्टन स्कूलमधून एमबीए केले आणि अमेरिकेतच इन्व्हेस्टमेंट बँकर म्हणून काम केले.

येस बँकेच्या धोरणात आमूलाग्र बदल करण्यात राखी यांचीच भूमिका असल्याचे मानले जाते. त्या आठ वर्षांच्या असताना संपूर्ण कुटुंब मुंबईत स्थलांतरित झाले. वडिलांनी बँकर म्हणून काम सुरू केले. जेवणाच्या टेबलवर दररोज रात्री अर्थविषयक चर्चा होत होती आणि राखीच्या करिअरचा रस्ताही येथूनच ठरला. राणा कपूर यांनी घरातच एक एज्युकेशन सेंटर स्थापन केले होते. तीन मुलींना प्रोत्साहन मिळावे याासाठी त्या खोलीतील चांगल्या वस्तू आणि पुस्तकांची माहिती स्वत: देत असत. हा एक योगायोग म्हणू शकता, येस बँकेचा आयपीओ आला तेव्हा राखी तिथे इंटर्नशिप करत होत्या. मोठी बहीण राधाच्या खूप जवळ असणाऱ्या राखी रोशनीसाठी मार्गदर्शक आहेत. रोशनीच्या बोर्ड परीक्षेसाठी त्या तिला गणित विषय शिकवत होत्या. खाण्याची आवड असल्यामुळे अमेरिकेत जेपी मोर्गन आणि गोल्डमन सॅक्ससोबत काम करताना त्या रात्री आईला फोनवर रेसिपी विचारत होत्या.

दोन वर्षांपूर्वी दिल्लीच्या ताज पॅलेस हॉटेलमध्ये अल्केश टंडन यांच्याशी त्यांचा विवाह झाला. अल्केश स्टील किंग लक्ष्मीनिवास मित्तल यांचे जावई अमित भाटिया यांचे चुलतभाऊ आहेत. त्यांचा दुबईत व्यवसाय आहे. ते तिथे इंटेरिअर्सचे इंटरनॅशनल बुटिक चालवतात. अल्केश आणि राखीची ओळख सुटीच्या काळात ब्रिटनमध्ये झाली होती.

दोघांच्या लग्नाला मित्तल, अंबानी कुटुंब आणि यूपीए सरकारमध्ये मंत्रिपद भूषवलेले अनेक नेते होते. प्रसिद्ध टेनिसपटू बोरिस बेकरही आला होता. राखी यांचे पती अल्केश यांनी अमित आणि लक्ष्मीनिवास मित्तल यांची कन्या वनीशा यांना जवळ आणण्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावली होती. आता राखी दोन कंपन्या चालवतात. त्यामध्ये लहान ग्राहक मॉर्टगेज फायनान्स देणारी रास हाऊसिंग आणि दुसरी रुरल अॅग्री व्हेंचर्स आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, राखी कपूर-टंडन यांचे निवडक फोटो...